Rohit Sharma Virat Kohli Twitter
क्रीडा

IND vs ENG 1st ODI: कोहली बाहेर पडल्यास 'या' खेळाडूला मिळू शकते प्लेइंग 11 मध्ये संधी

पहिल्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा फिटनेस टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. सध्या कंबरेच्या दुखापतीमुळे विराट संघासोबत लंडनला गेला नसल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

IND vs ENG 1st ODI: भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात करणार आहे. याआधी वनडे मालिकेत संघाने 2-1 असा विजय मिळवला होता. त्याचवेळी मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा फिटनेस टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. विराट काही खास फॉर्ममध्ये नसला तरी त्याची क्षमता कोणीही नाकारू शकत नाही. सध्या कंबरेच्या दुखापतीमुळे विराट कोहली संघासोबत लंडनलाही गेला नसल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळाली आहे. अशा परिस्थितीत विराट नाही तर त्याची जागा कोण घेईल हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित जाला आहे.

दुसरीकडे, वनडे संघाबद्दल बोलायचे झाले तर शिखर धवन कर्णधार रोहित शर्मासोबत मैदानात उतरणार आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराटच्या अनुपस्थितीत शेवटच्या टी-20 सामन्यातील शतकवीर सूर्यकुमार यादवला पाठवले जाऊ शकते. त्याचबरोबर ऋषभ पंत काही काळापासून वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसत आहे. श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा पाचव्या स्थानासाठी संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजीसमोर अय्यर संकटात सापडलेला दिसत असला तरी विराटच्या दुखापतीमुळे त्याला नक्कीच संधी मिळू शकते.

असे असले तरी डावखुरा फलंदाज इशान किशनही या जागेसाठी दावेदार ठरू शकतो. यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणारा हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर खेळणार आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. यानंतर 8व्या स्थानासाठी शार्दुल ठाकूर असू शकतो परंतु त्याच्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. फलंदाजी जोरदार करायची असेल तर शार्दुलही मैदानात उतरू शकतो. अन्यथा बुमराह, शमी आणि कृष्णा हे तीन वेगवान गोलंदाज असतील. एकमेव फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहलचे खेळणे निश्चित मानले जाऊ शकते.

या दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग 11 आहेत

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, प्रशांत कृष्णा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT