आता त्याच्या जागी सलामीला कोण हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. भारताकडे सलामीला सध्या तीन पर्याय उपलब्ध (Three options available) आहेत.  dainik gomantak
क्रीडा

IND vs ENG: मयंकच्या दुखापतीनंतर सलामीसाठी भारताकडे 'हे' तीन पर्याय

सोमवारी नेटमध्ये सराव करताना मयंकला मोहम्मद सिराजने टाकलेला चेंडू डोक्याला लागल्याने त्याला दुखापत झाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारताची उद्यापासून इंग्लंड (India vs England) विरुध्दच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पण या मालिके आधी भारताला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर मयंक अगरवाल (Mayank Agarwal) हा काल नेटमध्ये सराव करताना जायबंदी (Injury) झाला आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार असून, आता त्याच्या जागी सलामीला कोण हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. भारताकडे सलामीला सध्या तीन पर्याय उपलब्ध (Three options available) आहेत.

सोमवारी नेटमध्ये सराव करताना मयंकला मोहम्मद सिराजने टाकलेला चेंडू डोक्याला लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. यापूर्वी युवा फलंदाज शुबमन गिल याने या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात कोण करणार असा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. भारताकडे सलामीला (Open to India) सध्या के.एल.राहुल, अभिमन्यु ईश्वरन आणि हनुमान विहारी (KL Rahul, Abhimanyu Ishwaran and Hanuman Vihari) हे तीन सलामीवीरसाठी पर्याय आहेत. यामध्ये के.एल. राहुल याचे नाव आघाडीवर आहे.

अशी असेल इंग्लंडविरुध्दची मालिका

पहिला सामना – 4 ते 8 ऑगस्ट, नॉटिंघम

दुसरा सामना – 12 ते 16 ऑगस्ट, लॉर्डस

तिसरा सामना – 25 ते 29 ऑगस्ट, लीडस

चौथा सामना – 2 ते 6 सप्टेंबर, द ओव्हल

पाचवा सामना – 10 ते 14 सप्टेंबर, मॅनचेस्टर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT