Kuldeep Yadav | IND vs BAN Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: कशी नशिबाने थट्टा मांडली! पहिल्या कसोटीचा 'हिरो' ढाका कसोटीत ड्रॉप, केएल राहुल म्हणतोय...

कुलदीप यादवला बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे.

Pranali Kodre

IND vs BAN, 2nd Test: भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना ढाक्यात खेळत आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारतीय संघव्यवस्थापनाने अंतिम 11 जणांच्या संघातून कुलदीप यादवला बाहेर केले आहे. याबद्दल सध्या चर्चा होत आहे.

चायनामन गोलंदाज कुलदीपने चितगावला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात मिळून 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्याला पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कारही मिळाला होता. पण असे असतानाही त्याला दुसऱ्या कसोटीतून वगळल्याने भारतीय संघव्यवस्थापनावर टीका होत आहे.

(Kuldeep Yadav dropped from Playing XI of team India)

कुलदीपच्या जागेवर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटची अंतिम 11 जणांच्या संघात निवड करण्यात आली आहे. जयदेव12 वर्षांनंतर भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळत आहे.

दरम्यान, कुलदीपला वगळण्याबाबत भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल नाणेफेकीवेळी म्हणाला, 'आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. आता चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे. पहिल्या डावात चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता आहे. खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा आहे आणि आम्हाला लवकर विकेट्स घ्याव्या लागतील.

'आम्ही एक बदल केला आहे. कुलदीपच्या जागेवर जयदेवला सामील केले आहे. कुलदीपला बाहेर ठेवण्याचा निर्णय दुर्दैवी आहे, पण ही उनाडकटसाठी संधी आहे.'

कुलदीपला संधींची कमी

कुलदीपने आत्तापर्यंत कसोटीत जेव्हाही संधी मिळाली, तेव्हा चांगली कामगिरी केलेली आहे. पण त्याला जेव्हा संघाला एखाद्या ज्यादाच्या फिरकीपटूची गरज असते, तेव्हाच संधी मिळालेली दिसून आली आहे. त्याने गेल्या 5 वर्षांत केवळ 8 कसोटी सामनेच खेळले आहेत.

त्याने या 8 कसोटीत 34 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने 3 वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT