Rohit Sharma & Pat Cummins 
क्रीडा

IND vs AUS: नागपूर कसोटीपूर्वी स्टेडियमची अचानक वाढवली सुरक्षा, सामन्यापूर्वी काय म्हणाले अधिकारी जाणून घ्या

IND vs AUS, 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात 40 हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. या सामन्याबाबत बरीच चर्चा रंगली आहे.

दोन्ही संघाच्या सुरक्षेसाठी एकूण दोन हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. बुधवारी एका अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिली. दोन्ही संघांच्या सुरक्षेबाबत पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

दोन हजार पोलिस तैनात असतील

अधिकाऱ्याने सांगितले की, संघांच्या हॉटेल्सपासून जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर क्विक रिअ‍ॅक्शन फोर्स (क्यूआरटी) कर्मचारी तैनात केले जातील.

अधिकाऱ्याने सांगितले की, नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "आठ पोलिस उपायुक्त (डीसीपी), 10 सहायक पोलिस आयुक्त (एसीपी), 35 पोलिस निरीक्षक, 138 सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) यांच्यासह 2000 पोलिस कर्मचारी येथे तैनात केले जातील. सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून, सर्व प्रवेश बिंदूंवर 40 हून अधिक मेटल डिटेक्टर आणि डोअर फ्रेम मॉनिटर्स स्थापित केले जातील."

दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. WTC फायनलच्या दृष्टीने ही मालिका जिंकणे दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. भारतीय संघाने मागील तीन बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकल्या आहेत.

त्याचवेळी, भारताने ऑस्ट्रेलियाच्या (Australia) घरच्या मैदानावर यापैकी दोन ट्रॉफी जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 18 वर्षांपासून भारतात एकही मालिका जिंकलेली नाही. अशा स्थितीत कांगारु संघाला या मालिकेत चांगली कामगिरी करायला आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT