Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs AUS: 'हिटमॅन'चा जलवा; ऑस्ट्रेलियावर मिळवला दणदणीत विजय

India vs Australia T20 2022: T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन T20 सामन्यांची मालिका खेळत आहे.

दैनिक गोमन्तक

India vs Australia T20 2022: T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन T20 सामन्यांची मालिका खेळत आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरा टी-20 सामना नागपूरच्या मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने (Australia) 8 षटकांत 91 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 4 चेंडू राखून 6 विकेट्स राखून सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 46 धावा केल्या. 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची (India) सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सुरुवातीच्या षटकांमध्ये षटकार ठोकत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. भारताची पहिली विकेट तिसऱ्या षटकात केएल राहुलच्या रुपाने आली. राहुल 6 चेंडूत 10 धावा करुन बाद झाला. विराट कोहली 6 चेंडूत 11 धावा करुन बाद झाला.

दुसरीकडे, नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी गमावून 90 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने 43 धावा केल्या. कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने 31 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने दोन बळी घेतले.

तसेच, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्याच षटकात कॅमेरुन ग्रीनच्या रुपाने पहिला धक्का बसला. 5 धावा करुन तो धावबाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. पुढच्या षटकात टीम डेव्हिडही क्लीन बोल्ड झाला. मात्र, मॅथ्यू वेडने धडाकेबाज फलंदाजी करत 20 चेंडूत 43 धावा केल्या.

रोहितच्या झंझावातात ऑस्ट्रेलियाने धुमाकूळ घातला

नागपुरात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पावसामुळे हा सामना 8-8 षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या आणि भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 7.2 षटकांत 92 धावा केल्या आणि सामना 6 विकेटने जिंकला. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने 46 धावा केल्या. रोहित शर्माने 20 चेंडूत 46 धावांची तुफानी खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arunima Bose English Channel: 15 तास 58 मिनिटांचा जलप्रवास; गोव्याच्या लेकीचं नाव जागतिक पातळीवर, अरुणिमानं पार केली इंग्लिश खाडी

IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद सिराजवर ICC ची कडक कारवाई, बेन डकेटशी पंगा पडला महागात

Ro-Ro Ferry in Goa: गोव्याला देशातील पहिल्या रो-रो फेरीचा मान; रायबंदर-चोडण जलमार्गावर सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Goa Road Accidents: गोव्यातील अपघात व बळी कमी होऊ शकतात, 'या' प्रक्रिया बंधनकारक करणे आवश्यक; Video

Ahmedabad Plane Crash: 'पायलटवर आरोप नको'; अहमदाबाद विमान अपघात अहवालातील दाव्यांवर पायलट संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT