Cameron Green  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 2nd ODI: धावा देण्यात ग्रीननं ठोकलं शतक, नावावर केला लाजिरवाणा रेकॉर्ड!

Manish Jadhav

India vs Australia 2nd ODI Cameron Green Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

शुभमन गिलने 104 धावा करुन विस्फोटक सुरुवात करुन दिली. श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या, त्यानंतर केएल राहुलने 52, इशान किशनने 31, सूर्यकुमार यादवने 72 आणि रवींद्र जडेजाने 13 धावा केल्या.

टीम इंडियाच्या (Team India) या धाकड फलंदाजांनी भारताची धावसंख्या 399 धावांपर्यंत नेली. यादरम्यान सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियन गोलंदाज कॅमेरुन ग्रीनच्या षटकात सलग 4 षटकार ठोकले. ग्रीनने 10 षटकात 2 गडी बाद करत 103 धावा दिल्या.

वनडेमध्ये सर्वाधिक धावा देणारा जगातील 12 वा आणि ऑस्ट्रेलियातील तिसरा गोलंदाज

दरम्यान, कॅमेरुन ग्रीनने आपल्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारा तो जगातील 12 वा गोलंदाज ठरला.

विशेष म्हणजे, यामध्ये तो ऑस्ट्रेलियाचा (Australia) तिसरा गोलंदाजही ठरला. वनडे डावात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिक लुईसच्या नावावर आहे. त्याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 113 धावा देत हा विक्रम केला होता.

तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पा या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. अलीकडेच, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 113 धावा दिल्या होत्या.

आता या यादीत कॅमेरुन ग्रीनचा समावेश झाला आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. ज्याने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 106 धावा दिल्या होत्या.

जोश हेझलवुड किफायतशीर गोलंदाज ठरला

ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरुन ग्रीन हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शॉन अॅबॉटने त्याच्या 10 च्या कोट्यात 91 धावा दिल्या, तर जोश हेझलवूड सर्वात किफायतशीर ठरला. त्याने 10 षटकात 62 धावा देत ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT