Azmatullah Umarzai and Mohammad Nabi Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs AFG: अफगाणिस्तानने भारताविरुद्ध पहिल्यांदाच केली अशी कामगिरी; 14 वर्षे जुन्या विक्रमाशी साधली बरोबरी

India vs Afghanistan 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सहाव्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका डावात दोन फिफ्टी प्लसची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Manish Jadhav

India vs Afghanistan 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा केल्या. मोहम्मद नबीने सर्वाधिक 42 धावा केल्या. संथ सुरुवात करुनही अफगाण संघाने सन्मानजनक धावसंख्या उभारली. या डावात अफगाणिस्तानसाठी पन्नास किंवा त्याहून अधिक धावांच्या दोन भागीदारी झाल्या आणि अफगाणिस्तान संघाने पहिल्यांदाच अशी कामगिरी केली.

अफगाणिस्तानने दोन विक्रम केले

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सहाव्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका डावात दोन फिफ्टी प्लसची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अजमतुल्ला उमरझाई आणि मोहम्मद नबी यांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध अफगाणिस्तानची ही संयुक्त-सर्वोच्च भागीदारी होती. यापूर्वी, 2010 मध्ये अश्गर अफगाण आणि नूर अली जादरान यांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली होती. या डावात ओपनिंग करताना रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनीही 50 धावांची भर घातली.

अखेरच्या पाच षटकांत भारतीय गोलंदाजांना चोपलं

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या 13 षटकांमद्ये आपली पकड कायम ठेवली, मात्र त्यानंतर मोहम्मद नबीने क्रीझवर येताच फटकेबाजी सुरु केली. त्याने 27 चेंडूत 42 धावा केल्या. यानंतर अखेरीस नजीबुल्ला जादरान 11 चेंडूत 19 धावांच्या बळावर भारताला विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य दिले.

अफगाणिस्तानने शेवटच्या पाच षटकात 53 धावा केल्या. अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात 15 धावा दिल्या. अक्षर पटेल 4 षटकांत 23 धावांत 2 बळी घेत सर्वोत्तम गोलंदाज ठरला. तर शिवम दुबेने 2 षटकात 9 धावा देत 1 बळी मिळवला. मुकेश कुमारनेही 2 बळी घेतले आणि त्याने 4 षटकात 33 धावा दिल्या. अर्शदीपने पहिल्या 3 षटकात एका मेडनसह केवळ 13 धावा दिल्या होत्या, परंतु त्याने शेवटच्या षटकात 15 धावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT