Minister Govind Gaude Dainik Gomantak
क्रीडा

Goa Sports News : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्क्वे मार्शल आर्टचा समावेश

यजमान या नात्याने गोव्याकडून खेळाला संधी मिळणार असल्याची क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sports News : पुढील वर्षी गोव्यात नियोजित असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्क्वे मार्शल आर्ट खेळाचा समावेश करण्याची घोषणा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केली. या खेळास संधी मिळाल्यास 30 ते 35 जिंकण्याची हमी संघटनेचे सचिव काशिनाथ नायक यांनी दिली. फातोर्डा येथील इनडोअर स्टेडियममध्ये 17 व्या राज्यस्तरीय स्क्वे मार्शल आर्ट स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. त्यावेळी क्रीडामंत्री गावडे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते.

क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ‘‘पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीला सुरवात झाली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडे बोलणी झाली आहे. यजमान या नात्याने गोव्याला एक-दोन क्रीडा प्रकारांचा समावेश करण्याची संधी आहे. स्क्वे मार्शल आर्टबाबत आयओएकडे चर्चा झाली आहे.’’ यजमान या नात्याने गोव्याला जास्तीत जास्त पदके जिंकावी लागतील. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. गोव्यात साधनसुविधांचा अभाव नाही. आता आमचा भर खेळा़डूंच्या प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरीवर असेल, त्यासाठी क्रीडा संघटनांना सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असेही गावडे यांनी सांगितले. गुजरातमधील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला केवळ पाच ब्राँझपदके जिंकता आली याचा खेद असल्याचे सांगून त्यांनी स्पर्धेपूर्वी खेळाडूंना सराव व प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे कारण दिले.

हमखास पदके

काशिनाथ नायक यानी सांगितले, की ‘‘राज्यात हा खेळ 2006 साली सुरु झाला व गोव्याने राष्ट्रीय पातळीवर 1700 हून जास्त पदके जिंकली आहेत. गोवा देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पुढील वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या खेळाचा समावेश केला, तर गोव्याला त्यात 30 ते 35 पदके जिंकता येतील आणि यामध्ये 18 ते 20 सुवर्णपदके असतील.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT