South Africa
South Africa  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: टीम इंडियानं आफ्रिकेसमोर टाकली कात

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिका दौरा भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. कसोटी मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली आहे. शुक्रवारी, 21 जून रोजी पार्लमधील बोलंड पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा 6 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. (In the second ODI South Africa defeated Team India)

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने 19 जानेवारीला पार्लमध्येच खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र पुन्हा एकदा टीम इंडियाला (Team India) फलंदाजी आणि गोलंदाजीच्या आघाडीवर ताकद दाखवता आली नाही. भारताकडून मिळालेले 288 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 49 व्या षटकात अवघे ३ गडी गमावून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेसाठी जेनेमन मलान आणि क्विंटन डी कॉक या दोन्ही सलामीवीरांनी उत्कृष्ट खेळी केली.

तसेच, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंत आणि केएल राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने 287 धावा केल्या. गेल्या 2 वर्षांपासून सुरु असलेल्या कथेची पुनरावृत्ती झाली. टीम इंडियाचे गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरले. क्विंटन डी कॉक आणि मलान या सलामीच्या जोडीने आक्रमक फलंदाजी करताना शतकी भागीदारी केली.

डेकॉक-मालनची सर्वोत्तम खेळी

जसप्रीत बुमराहने भारतीय संघाची उत्तम सुरुवात करुन दिली, परंतु भुवनेश्वर कुमारविरुद्ध डेकॉक आणि मालन यांनी जोरदार फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभा केला. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतके पूर्ण करत अवघ्या 16 षटकांत संघाला 100 धावांच्या पुढे नेले. पहिल्या यशासाठी भारताला 22 व्या षटकाची वाट पाहावी लागली. शार्दुल ठाकूरने डी कॉकला (78 धावा, 66 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार) LBW बाद केले. डी कॉक आणि मलान यांच्यात 132 धावांची भागीदारी झाली. आणि ही भागीदारीच विजयासाठी निर्णायक ठरली.

यमन मालनचे शतक हुकले

या यशानंतर भारताला पुन्हा दुसऱ्या यशासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा याने मलानसोबत दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. मालनचे चौथे अर्धशतक हुकले. त्याला जसप्रीत बुमराहने 91 धावांवर (108 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार) बोल्ड केले. मात्र, तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेने २१२ धावा केल्या होत्या. मलाननंतर बावुमा (35) याला युझवेंद्र चहलने त्याच्याच चेंडूवर झेलबाद करुन पॅव्हेलियनमध्ये परतवले. मात्र, यानंतर रासी व्हॅन डर डुसेन आणि एडन मार्कराम यांनी आणखी एकही विकेट पडू दिली नाही. 74 धावांची शानदार भागीदारी करत सामना शेवटपर्यंत सामना नेला.

पंत चमकला मात्र...

भारतीय डावाचा विचार केला तर टीम इंडियाची फलंदाजी पुन्हा एकदा प्रभाव पाडू शकली नाही. कर्णधार केएल राहुल आणि शिखर धवन या जोडीने 63 धावांची सलामीची भागीदारी केली. परंतु त्यानंतर धवन आणि विराट कोहली सलग दोन षटकांत बाद झाले. त्यानंतर राहुलने ऋषभ पंतसोबत 115 धावांची भागीदारी केली. राहुलने संथ फलंदाजी करत 79 चेंडूत 55 धावा केल्या. त्याचवेळी पंतने संघाच्या धावसंख्येला गती दिली. मात्र त्याचे शतक हुकले. त्याने 71 चेंडूत 85 धावा (10 चौकार, 2 षटकार) करुन बाद झाला. दुसरीकडे श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर या वेळीही विशेष काही करु शकले नाहीत. अखेरीस शार्दुल ठाकूर (नाबाद 40) आणि रविचंद्रन अश्विन (नाबाद 25) यांनी 48 धावांची जलद भागीदारी करत संघाला 6 विकेट गमावून 287 धावांपर्यंत मजल मारली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: मडगाव येथे अपघातात एक ठार, एक जखमी

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT