Mithali Raj
Mithali Raj Dainik Gomantak
क्रीडा

ICC ODI Ranking मध्ये मिताली राजचा जलवा, दक्षिण आफ्रिकेच्या स्टार फलंदाजाला टाकले मागे

दैनिक गोमन्तक

भारतीय कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) आयसीसी एकदिवसीय महिला फलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती केली आहे. तर वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) दुसऱ्या स्थानावर कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताच्या दीप्ती शर्माने (Deepti Sharma) एका स्थानाने प्रगती करत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. मितालीचे 738 रेटिंग गुण असून ऑस्ट्रेलियाची अ‍ॅलिसा हिली 750 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. (In The ICC ODI Rankings Mithali Raj Has Overtaken The African Player)

दरम्यान, भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधना (Smriti Mandhana) 710 गुणांसह सहाव्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा जोनासन 760 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर झुलन 727 गुणांसह आहे. ऑस्ट्रेलियाची मेगन शुट 717 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

तसेच, अष्टपैलू खेळाडूंमध्ये इंग्लंडची नताली स्कायव्हर अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेची मारियान कॅप तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर वेस्ट इंडिजची (West Indies) हेली मॅथ्यूज दोन स्थानांचा फायदा झाला असून सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT