Rajasthan Royals  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: राजस्थान रॉयल्सने लाँच केली खास जर्सी

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 45 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 45 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. लीगमध्ये राजस्थानसाठी हा सामना खूप खास असणार आहे. संजू सॅमसनची टीम एक खास जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थानची टीम शेन वॉर्नचे नाव छापलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) या खास जर्सीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शेन वॉर्नचे (Shane Warne) नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते थायलंडला सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. शेन वॉर्न हे राजस्थान रॉयल्सचे पहिले कर्णधार होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली संघाने एकमेव विजेतेपद जिंकले. (In IPL 2022 Rajasthan Royals have launched a jersey named after Shane Warne)

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्न यांच्या सन्मानार्थ लाँच केलेली जर्सी गुलाबी आणि निळ्या रंगाची आहे. जर्सीच्या कॉलरवर SW 23 लिहिलेले आहे. म्हणजेच शेन वॉर्न आणि 23 हा त्यांच्या जर्सीचा नंबर होता. राजस्थान रॉयल्सच्या यशात शेन वॉर्न यांचा मोठा वाटा होता. पहिल्या सत्रात त्यांच्याबरोबर संघात अगदी नवखे खेळाडू होते. अशातही वॉर्न यांनी राजस्थानला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून दिले.

राजस्थानने चेन्नईला हरवून आयपीएलचे पहिले जेतेपद जिंकले

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) सारख्या बलाढ्य संघाचा पराभव करुन राजस्थान आयपीएल विजेता ठरला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने 5 फलंदाजाच्या मोबदल्यात 163 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 8 धावांची गरज होती.

दुसरीकडे, चेन्नईसाठी लक्ष्मीपती बालाजीने पहिल्या 3 चेंडूत केवळ 2 धावा दिल्या. मात्र असे असतानाही राजस्थानने बाजी मारली. तन्वीर आणि शेन वॉर्नने अनुभवाचा फायदा घेत संघाला चॅम्पियन बनवले. आयपीएल 2008 मध्ये राजस्थानचा कर्णधार शेन वॉर्नने अप्रतिम गोलंदाजी करताना 15 सामन्यात 19 बळी घेतले होते. तर सोहेल तन्वीरने 22 आणि शेन वॉटसनने 17 विकेट घेतल्या. फलंदाजीत ग्रॅम स्मिथने 441, शेन वॉटसनने 472 आणि युसूफ पठाणने 435 धावा केल्या होत्या.

वॉर्नसाठी कायपण

राजस्थानचा संघ सध्याच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 8 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांक आहे. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सच्या प्रत्येक चाहत्याला संघाने आपली चांगली कामगिरी कायम राखून यंदा चॅम्पियन बनवायचे आहे. सध्या राजस्थान रॉयल्सला शेन वॉर्नसाठी शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT