ICC U19 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

ICC U19 World Cup: प्रत्येक संघाची भारतासमोर शरणागती!

स्पर्धेतील सर्व 6 सामन्यांमध्ये भारताने एकाही संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही.

दैनिक गोमन्तक

भारतीय अंडर-19 (Under-19) क्रिकेट संघासाठी विश्वचषक (ICC U19 World Cup) हा खूप मोठा प्रवास ठरला आहे. टीम इंडियाने (Team India) फायनलपर्यंतचा प्रवास केला आणि यावेळी कोणत्याही संघाला आपले वर्चस्व निर्माण होऊ दिले नाही. संघाच्या फलंदाजांनी काही उत्कृष्ट खेळी खेळल्या, तर गोलंदाजांनी एक पाऊल पुढे जाऊन विरोधी फलंदाजांना मोठी, धावसंख्या करण्यापासून रोखले, आणि परिस्थिती अशी होती की या स्पर्धेतील सर्व 6 सामन्यांमध्ये भारताने एकाही संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही.

भारताने ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa), आयर्लंड आणि युगांडाविरुद्ध सामने खेळले आहेत. त्यांच्या पहिल्याच सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 232 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 187 धावांतच गुंडाळला होता. त्याचप्रमाणे आयर्लंडविरुद्ध 307 धावा केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ 133 धावांवर गारद झाला. दुसरीकडे, भारताने युगांडाविरुद्ध 405 धावांची मोठी धावसंख्या उभारली, तर युगांडा 79 धावांवर गारद झाला.

ग्रुप स्टेजनंतर भारताची ही उत्कृष्ट कामगिरी नॉकआउट फेरीत कायम राहिली. उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशचा अवघ्या 111 धावांतच पराभव केला आणि 5 गडी राखून विजय मिळवला. यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना झाला, ज्यामध्ये भारताने 290 धावांची मजबूत धावसंख्या उभारली आणि ऑस्ट्रेलियाला 194 धावांवर रोखून अंतिम फेरीत उडी मारली.

भारतीय गोलंदाजांनी अंतिम फेरीतही असाच पराक्रम केला, जिथे त्यांचा सामना इंग्लंडच्या बलाढ्य संघाशी झाला. इंग्लंडने ( England) प्रथम फलंदाजी केली, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही, राज अंगद बावाच्या 5 विकेट आणि रवी कुमारच्या 4 विकेट्सच्या जोरावर भारताने इंग्लंडला अवघ्या 189 धावांत गारद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT