imran khan Dainik Gomantak
क्रीडा

Imran Khan: इम्रान खान पुन्हा वादात! महिलेबरोबर अश्लील संभाषणाची 'ऑडिओ क्लिप' व्हायरल

'सेक्स कॉल' संदर्भात इम्रान खान वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Pranali Kodre

Imran Khan: पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री आणि क्रिकेटपटू इम्रान खान एका नवीन वादात अडकले आहेत. सध्या सोशल मीडियावर अश्लील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, जी क्लिप इम्रान खान यांची असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानसह क्रिकेट विश्वातही खळबळ उडाली आले.

दरम्यान, या क्लिपची विश्वासार्ह्यता अद्याप सिद्ध झालेली नाही. मात्र, यात इम्रान असे नाव आलेले आहे. या क्लिपनुसार कथित रुपात एक महिलेशी इम्रान खान अश्लील चर्चा करत आहेत. रिपोर्ट्सनुसार सैय्यद अली हैदर नावाच्या एका स्थानिक पाकिस्तानी पत्रकाराने ही क्लिप युट्यूब चॅनेलवर लीक केली आहे.

त्याने दोन भागात ही क्लिप युट्यूबवर अपलोड केली आहे. तसेच असेही म्हटले जात आहे की ही क्लिप पाकिस्तानी प्रधानमंत्री कार्यालयातील आहे. तसेच इम्रान खान ज्या महिलेशी संवाद साधत आहेत, ती त्यांच्याच पक्षाची मंत्री असल्याचेही म्हटले जात आहे. त्याचबरोबर ही ऑडिओ क्लिप जुनी असल्याचीही चर्चा आहे.

दुसऱ्या क्लिपमध्ये इम्रान महिलेला जवळ येण्यास सांगत असल्याचे ऐकू येत आहे. पण ती महिला त्यांना नकार देत आहे. तसेच महिला त्यांना तिच्यासाठी काय केले, असेही विचारत आहे. या क्लिपमध्ये इम्रान नावाचा व्यक्ती असेही म्हणताना ऐकू येत आहे की त्यांची मुलं त्यांना भेटायला येणार आहेत, तर त्या कार्यक्रमाची वेळ बदलता येईल.

या क्लिपबद्दल पाकिस्तानी पत्रकार नैला इनायतने ट्वीटरवर लिहिले आहे की 'कथित सेक्स कॉल लीक प्रकरणात इमरान खान इमरान हाश्मी बनले आहेत.'

मात्र, इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफने ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान इम्रान खान यांची अशा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा विविध वादात ते अडकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT