Suraj Lotlikar Dainik gomantak
क्रीडा

सूरज लोटलीकर यांच्यावर बीसीसीआयची महत्त्वाची जबाबदारी

जीसीए व्यवस्थापकीय समितीत सदस्य, नंतर उपाध्यक्ष आणि 2018 मध्ये ते अध्यक्ष बनले

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) अध्यक्ष सूरज लोटलीकर यांच्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशासकीय निरीक्षकपदी त्यांना नियुक्त करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेतील कोविडविषयक विलगीकरण प्रक्रिया संपवून सूरज केपटाऊन येथील तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात सामील झाले.

या कसोटीनंतर होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठीही ते प्रशासकीय निरीक्षक असतील. दौऱ्यातील शेवटचा एकदिवसीय सामना 23 जानेवारीस खेळला जाईल. कोविड परिस्थितीत दौऱ्यावरील भारतीय संघाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी बीसीसीआयने सूरज यांची विशेष नियुक्ती केली आहे.

सूरज गोमंतकीय क्रिकेटमधील (Cricket) दीर्घानुभवी प्रशासक आहे. 90 च्या दशकापासून ते गोवा (goa) क्रिकेट असोसिएशनशी सबंधित आहेत. अगोदर क्रिकेटपटू, नंतर स्टॅमिना क्लबचे पदाधिकारी बनल्यानंतर त्यांनी जीसीएच्या निवड समितीतही काम केले. जीसीए व्यवस्थापकीय समितीत सदस्य, नंतर उपाध्यक्ष आणि 2018 मध्ये ते अध्यक्ष बनले. यापूर्वी भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत बीसीसीआय निरीक्षक या नात्यानेही जबाबदारी पेलली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

नाताळची लगबग सुरू! सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या, दर 10 टक्क्यांनी वाढले

हडफडे क्लब आगीतील 3 मृतदेहांवर झारखंडमध्ये अंत्यसंस्कार; सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत

गोवा-शिर्डी, गोवा-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करावी, सदानंद शेट तानावडेंची राज्यसभेत मागणी

SCROLL FOR NEXT