India vs Australia | World Cup 2023 Final 
क्रीडा

World Cup 2023: पहिली 10 षटके, भारताची फलंदाजी अन्..., IND vs AUS फायनलमध्ये महत्त्वाच्या ठरणार 'या' गोष्टी

India vs Australia: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात कोणत्या बाबी महत्त्वाच्या असणार आहेत, याचा आढावा घेऊ.

Pranali Kodre

Important Factors about India vs Australia ICC ODI Cricket World Cup 2023 Final:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये आहेत.

भारताने या अंतिम सामन्याआधी सलग 10 विजय मिळत प्रवेश केला आहे, तर ऑस्ट्रेलियाने सलग 8 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. त्यामुळे दोन्ही संघात रोमांचक सामना पाहायला मिळण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघांसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत, यावर एक नजर टाकू.

पॉवरप्लेमधील खेळ

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी पहिल्या पॉवरप्लेचा म्हणजेच पहिल्या 10 षटकांचा खेळ महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय संघाची पहिल्या १० षटकातील फलंदाजी विरुद्ध ऑस्ट्रेलियाची पहिल्या 10 षटकातील गोलंदाजी महत्त्वाची ठरणार आहे.

विशेष म्हणजे या दोन संघानी यावर्षीच्या स्पर्धेची सुरुवात एकमेकांविरुद्धच केली होती, त्यावेळी भारतीय संघाची वरची फळी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीसमोर सपशेल अपयशी ठरली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात पहिल्या 10 षटकांवर सर्वांचेच लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज हे सुरुवातीला काहीसे कसोटी क्रिकेटप्रमाणे गोलंदाजी करत आहेत. त्यांच्या संघाने पहिल्या 10 षटकात गुड लेंथवर गोलंदाजी केली आहे, तर भारतीय गोलंदाजांनी 41 टक्के गुडलेंथवर गोलंदाजी केली आहे.

भारतीय फिरकी गोलंदाजी अन् अखेरची 10 षटके

ऑस्ट्रेलियाकडे ऍडम झम्पा प्रमुख फिरकी गोलंदाज असला, तरी त्याला साथ देण्यासाठी ग्लेन मॅक्सवेल, ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन हे पर्यायी फिरकी गोलंदाजी करू शकणारे पर्याय ऑस्ट्रेलियाकडे आहेत.

मात्र असे असले, तरी भारतीय संघाची फिरकी गोलंदाजी ही ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ आहे. रविंद्र जडेजा आणि चायनामन गोलंदाजी करणारा कुलदीप यादव यांची मधल्या षटकांमधील गोलंदाजी या सामन्यात महत्त्वाची ठरणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाची मधली फळी रोखण्यासाठी हे दोन गोलंदाज सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

भारताने 11 ते 40 या षटकांमध्ये 4.78 च्या इकोनॉमीने धावा दिल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 5.60 च्या रनरेटने धावा या षटकांमध्ये गेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ताकद ही अखेरचे 10 षटकेही राहिली आहे, त्यांनी अखेरच्या 10 षटकात जवळपास प्रतिषटक 8 धावा काढल्या आहेत. तसेच भारतानेही अखेरच्या 10 षटकात पहिल्या 40 षटकांपेक्षा अधिकच्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. त्याचमुळे या सामन्यातील जसे पहिले 10 षटके महत्त्वाची असणार आहेत, तशीच अखेरची 10 षटकेही महत्त्वाची राहणार आहेत.

भारताची फलंदाजी

काही दिवसांपूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते की प्रशिक्षक राहुल द्रविडच्या साथीने प्रत्येक फलंदाजाला त्याची भूमिका स्पष्ट करून सांगितलेली आहे. त्याचेच परिणाम या स्पर्धेत दिसले आहेत.

भारताकडून सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करून दिली आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा विराट कोहली अँकर फलंजादाजी भूमिका म्हणजेच डाव सांभाळण्याची भूमिका बजावत आहे. त्यामुळे केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव अशा खेळाडूंना आक्रमक खेळण्याची मुभा मिळत आहे. त्यामुळे ही गोष्ट अंतिम सामन्यातही महत्त्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT