Imam-ul-Haq Dainik Gomantak
क्रीडा

Imam-ul-Haq ने केला मोठा विक्रम; असं करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला

पाकिस्तानने वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा ODI सामना देखील जिंकला.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानने वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा ODI सामना देखील जिंकला आहे. मुलतान येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 48 ओव्हरमध्ये 9 विकेट आणि 269 धावा केल्या. त्याचवेळी वेस्ट इंडिजचा संघ 37.2 ओव्हरमध्ये 216 धावा करून आऊट झाला. पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे हा सामना 53 धावांनी जिंकला आहे. (Imam ul Haq set a great record He became the second batsman in the world to do so)

पाकिस्तानकडून इमाम-उल हकने 62 धावा केल्या, तर शादाब खानने 78 चेंडूत 86 धावा करत पाकिस्तानला हा सामना जिंकून दिला. शादाबने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 सिक्सर मारले आहेत. शादाबच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 269 धावा केल्या आहेत. शादाबच्या खेळीने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली असली तरी इंझमाम-उल-हकचा भाचा इमाम उल हक याने 62 धावांची अर्धशतकी खेळी खेळून एक खास विक्रम केला आहे.

इमाम-उल-हकचा एकदिवसीय क्रिकेटमधला हा सलग सातवा 50 प्लस स्कोर आहे. असे करून इमामने सर्वात मोठ्या दिग्गज खेळाडूचा पराभव केला आहे. मार्क वॉ, गॉर्डन ग्रीनिज, अँड्र्यू जोन्स, मोहम्मद युसूफ, ख्रिस गेल, शाई होप, पॉल स्टर्लिंग, रॉस टेलर, बाबर आझम आणि केन विल्यमसन हे असे फलंदाज आहेत ज्यांनी सलग 6 वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 किंवा 50 प्लस धावा केल्या.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त सलग 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा फलंदाज जावेद मियांदाद आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग 9 डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम मियांदादच्या नावावरती आहे. मियांदादने केलेला हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाहीये.

त्याचवेळी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या वनडेत केवळ 1 रन काढून आऊट झाला. या सामन्यानंतर इमाम-उल-हकला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब देखील देण्यात आला. त्याचवेळी तिसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानच्या विजयात शादाब खान सामनावीर ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT