Ironman 70.3 Goa Dainik Gomantak
क्रीडा

Ironman 70.3 Goa: मुंबईचा निहाल बेग ठरला 'आयर्नमॅन'; गतविजेत्या बिस्वरजित सायखोमला टाकले मागे

टिम टिम शर्मा महिला गटात दुसऱ्या आल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

IRONMAN 70.3 Goa: गोव्यातील पणजी येथे रविवारी (दि.13) पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी निहाल बेग याने बाजी मारली आहे. एरोस्पेस अभियंता असलेला निहाल बेग आयर्नमॅन ठरला आहे. निहालने गतविजेत्या भारतीय लष्कराच्या बिस्वरजित सायखोम यांना मागे टाकत हा किताब आपल्या नावे केला आहे. रविवारी सकाळी मिरामार बीच येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता.

(IIT Bombay Alumni Aerospace Engineer Nihal Baig Clinches Title; Tim Tim Sharma Second Among Women)

गोव्यात पार पडलेल्या विश्वविख्यात आयर्नमॅन स्पर्धेसाठी जगभरातील 1,450 स्पर्धेक पात्र ठरले होते. आयर्नमॅन स्पर्धा जगातील एक आव्हानात्मक स्पर्धा असून, यात पोहणे, सायकलिंग आणि धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. गोव्यात झालेल्या स्पर्धेत 1.9km पोहणे, 90 km सायकलिंग आणि 21 km धावणे यांचा समावेश करण्यात आला होता. निहालने 4 तास 29 मि. आणि 45 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. पोहण्यात मी थोडा कमजोर आहे पण, धावण्यात पटाईत असल्याने यावेळी सायखोम यांना मागे टाकण्यात यशस्वी झालो अशी प्रतिक्रिया निहालने स्पर्धा जिंकल्यानंतर दिली.

याशिवाय भारतीय लष्करात काम करणारे बिस्वरजित सायखोम यांनी 4 तास 37 मि. आणि 21 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. तर, 40 वर्षीय पंकज धिमान यांनी 4 तास 40 मि. आणि 41 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावला.

तसेच महिला गटात, स्वित्झर्लंडच्या कॅटजिन शिअरबीकने 05:10:46 या वेळेसह पहिले क्रमांक पटकावला, तर भारताच्या टीम शर्माने 05:23:21 वेळेसह दुसरा आणि केतकी साठे या महिलेने 05:46.51 वेळेसह तिसरा क्रमांक पटकावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT