IPL 2022 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022 : एन्ट्री आधीच बिहार संघाच्या नावाची चर्चा; भन्नाट मीम्स होतायेत व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीझन (IPL 2022) आजपासून म्हणजेच 26 मार्चपासून सुरु होत आहे.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीझन (IPL 2022) आजपासून म्हणजेच 26 मार्चपासून सुरु होत आहे. मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई आयपीएलमध्ये चार वेळा चॅम्पियन आहे, तर दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सनेही (Kolkata Knight Riders) दोनदा जेतेपद पटकावले आहे. (If there is a Bihar team in the IPL what is its name discussion of funny names on social media)

दरम्यान, कोलकाताचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असताना रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) पहिल्यांदाच चेन्नईचे कर्णधारपद आले आहे. यावेळी दोन नवीन संघही आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. पहिला लखनऊ सुपर जायंट्स आणि दुसरा गुजरात टायटन्स. यामध्ये लखनऊचे कर्णधारपद केएल राहुलकडे (Kl Rahul) आहे, तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरातचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक ट्विट खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विचारण्यात येत आहे की, 'जर बिहारचा आयपीएलमध्ये संघ असता तर त्याचे नाव काय असते?'

वास्तविक, ट्विटरवर @Nirdayiii या नावाने हे ट्विट करण्यात आले आहे. त्यात गमतीशीरपणे असे म्हटले आहे की, जर आयपीएलमध्ये बिहारचा संघ असता तर त्याचे नाव 'जिया हो बिहार के लाला' असे झाले नसते. हे ट्विट 12 फेब्रुवारीचे असले तरी आजपासून आयपीएल सुरु होत असल्याने ते व्हायरल होत आहे.

तसेच, या ट्विटला सोशल मीडिया युजर्सनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि विशेष म्हणजे बिहारच्या संभाव्य संघाबद्दल मजेदार नावेही दिली जात आहेत. एका यूजर्सने पटना पँथर्स, दरभंगा डॅगर्स आणि छपरा चॅम्प्स सारखी नावे सुचवली आहेत, तर दुसर्‍या वापरकर्त्याने सट्टू सुपरचार्जर्स सारखी मजेदार नावे सुचवली आहेत.

शिवाय, आणखी एका यूजर्सने बिहारच्या टीमचे नाव सुचवले आहे. लिट्टी-चोखा बिहारमध्ये खूप प्रसिद्ध असल्याने, त्याने संघाचे नाव 'लिट्टी चोखा वॉरियर्स' असे सुचवले आहे, तर दुसऱ्या यूजर्सने संघाचे नाव 'थेकुआ किंग्स' असे ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT