Hardik Pandya statement on Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: '...तर त्याची फलंदाजी बघून निराश झालो असतो', पंड्याची सूर्यकुमारबद्दल मोठी प्रतिक्रिया

सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीबद्दल कर्णधार हार्दिक पंड्याने मोठे भाष्य केले आहे.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारताने श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यांत 91 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. भारताला हा विजय मिळवून देण्यात मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याच्या फलंदाजीबद्दल भारताचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही कौतुक केले आहे.

तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 112 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले. त्यामुळे तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 शतक करणारा रोहित शर्मानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. रोहितच्या नावावर 4 आंतरराष्ट्रीय टी20 शतके आहेत.

('I'd be disheartened on seeing his batting', says Hardik Pandya on Suryakumar Yadav)

सूर्यकुमारच्या या शतकामुळे भारताने 20 षटकात 5 बाद 228 धावा केल्या. दरम्यान सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, 'मला वाटते प्रत्येक खेळीमध्ये सूर्यकुमार सर्वांना चकीत करतो. तो आपल्या सर्वांना सांगतो की फलंदाजी किती सोपी आहे. तो एकामागोमाग एक अविश्वसनीय खेळी केल्या आहेत. मी जर त्याला गोलंदाजी करत असतो, तर मी त्याची फलंदाजी पाहून निराश झालो असतो.'

सूर्यकुमारला त्याच्या या शतकी खेळीमुळे सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्याने हा पुरस्कार मिळवल्यानंतर त्याच्या फलंदाजीच्या तयारीबद्दल प्रतिक्रिया दिली.

सूर्यकुमार म्हणाला, 'जेव्हा तुम्ही सामन्यासाठी तयारी करता, तेव्हा तुम्ही स्वत:वर दबाव टाकणे महत्त्वाचे असते. जर तुम्ही हे सरावावेळी केले, तर तुम्हाला सामना खेळताना सोपे जाते. यामध्ये खूप मेहनत सामील आहे, पण तुमचे चांगले सराव सत्र होणे महत्त्वाचे असते. तुम्हाला तुमचा खेळ माहित पाहिजे, त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता.'

या सामन्यात भारताने दिलेल्या 229 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 16.4 षटकांत 137 धावांवर सर्वबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fish Export:"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

Goa Assembly Live: सनबर्नला गोव्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार मायकल लोबो यांचे विधानसभेत आश्वासन

Viral Video: 'मी झाडांची महाराणी...!' झाडाच्या फांदीवर बसलेल्या महिलेची 'अजब' रील व्हायरल; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

ICC Rankings: भारतीय गोलंदाजांचा बोलबाला! आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची मोठी झेप

Sunburn Festival 2025: 17 वर्षांनी गोव्याला रामराम, यंदाचा 'सनबर्न' होणार मुंबईत; तारखा जाहीर!

SCROLL FOR NEXT