World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 India: वेळापत्रक घोषित! 'या' दिवशी होणार श्रीगणेशा, 46 दिवस रंगणार थरार

भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Pranali Kodre

World Cup 2023 India Schedule: भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. हा पुरुषांच्या क्रिकेटमधील 13 वा वनडे वर्ल्डकप आहे. या वर्ल्डकपचे वेळापत्रक आयसीसीने मंगळवारी जाहीर केले आहे.

या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबरला अहमदाबादला अंतिम सामना होणार आहे. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे मुंबई आणि कोलकाता येथे उपांत्य सामने पार पडतील. ही स्पर्धा एकूण 46 दिवस भारतातील 10 शहरात पार पडणार आहे.

वर्ल्डकप 2019 मधील अंतिम सामन्यात पोहचलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघातील सामन्यानेच अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबरला 2023 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी भारतीय संघ पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार.

World Cup 2023 Timetable

महत्त्वाचे सामने

भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्याशिवाय या स्पर्धेतील मोठ्या सामन्यांपैकी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 13 ऑक्टोबरला लखनऊला होईल, तसेच पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना बंगळुरूला 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे, तर 21 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मुंबईला सामना होणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 22 ऑक्टोबरला धरमशाला येथे सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात 4 नोव्हेंबर रोजी अहमदाबादला सामना होईल. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 29 ऑक्टोबरला लखनऊला सामना होईल.

अखेरचा साखळी सामना 20 नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात कोलकाताला होणार आहे.

बाद फेरीतील सामन्यांच्या वेळ अन् राखीव दिवस

दरम्यान उपांत्य सामना आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत जर हे सामने पूर्ण होऊ शकले नाहीत, तर राखीव दिवशी सामना खेळवला जाईल.

तसेच उपांत्य आणि अंतिम सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहेत.

या शहरात होणार सामने

46 दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेतील सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात होणार आहेत.

तसेच गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद येथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होतील.

दहा संघात होणार वर्ल्डकप

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीत सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत.

वर्ल्डकप 2023 साठी यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ थेट पात्र ठरले आहेत. पण अजून दोन संघ सध्या झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या क्वालिफायर स्पर्धेतून मुख्य स्पर्धेत सहभागी होतील.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक:

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विुरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT