Jasprit Bumrah Dainik Gokmantak
क्रीडा

ICC Test Ranking: जसप्रीत बुमराह ठरला कसोटीतील नंबर 1 गोलंदाज; आर. अश्विनला सोडले मागे!

Manish Jadhav

ICC Test Ranking:

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा फायदा झाला आहे. आता जसप्रीत बुमराह कसोटीत जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. सध्या त्याचे 881 गुण आहेत. बुमराहने इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावातही बुमराहने 3 फलंदाजांना बाद केले होते. बुमराहला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल ठरणारा जगातील पहिला गोलंदाज आहे.

अश्विनला मागे सोडले

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आणि कसोटी उपकर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) त्याचा सहकारी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मागे टाकले आहे. बुमराहपूर्वी आर अश्विन कसोटीत नंबर वन गोलंदाज होता, पण आता 881 गुणांसह जसप्रीत बुमराह कसोटीत नंबर वन गोलंदाज बनला आहे. नवीन ताज्या क्रमवारीनुसार आर अश्विन आता 841 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा 851 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजालाही धक्का बसला

आर. अश्विनशिवाय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यालाही ताज्या कसोटी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, या ताज्या रँकिंगपूर्वी जडेजा 8व्या स्थानावर होता, पण आता नवीन ताज्या रँकिंगनंतर तो 10व्या स्थानावर घसरला आहे.

दुसरीकडे, इंग्लंडचा 41 वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनलाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो 8व्या स्थानावरुन 7व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय, नॅथन लायन 10व्या स्थानावरुन 8व्या स्थानावर पोहोचला आहे. अश्विन, जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे भारताचे सर्वात महत्त्वाचे गोलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत.

बुमराहने हा खास विक्रम केला

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि कसोटी उपकर्णधार जसप्रीत बुमराह हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराह कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये अव्वल स्थान पटकावणारा आशियातील दुसरा खेळाडू ठरला आहे. बुमराहने 2022 मध्ये ट्रेंट बोल्टला मागे टाकून पहिल्या स्थानावर पोहोचला आणि T20 मध्ये बुमराह 2017 मध्ये नंबर वन गोलंदाज बनला. यानंतर बुमराह आता क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिले स्थान पटकावणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा खेळाडू

हा उत्कृष्ट विक्रम करणारा जसप्रीत बुमराह हा जगातील केवळ चौथा क्रिकेटपटू आहे. बुमराह व्यतिरिक्त, फक्त भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि मॅथ्यू हेडन हे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकले.

आता या यादीत जसप्रीत बुमराहच्या नावाचाही समावेश झाला आहे. विराट कोहलीनंतर बुमराह हा आशियातील दुसरा क्रिकेटपटू आहे, ज्याने हा टप्पा गाठला आहे. जसप्रीत बुमराहने ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला कसोटी क्रमवारीत मागे टाकले आहे.

बुमराह अप्रतिम

विशाखापट्टणम कसोटीत जेव्हा जेव्हा भारतीय संघाला विकेटची गरज भासली तेव्हा कर्णधार रोहित शर्माने कोणताही आडपडदा न ठेवता थेट आपला सर्वात विश्वासू गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे चेंडू सोपवला.

आपल्या कर्णधाराला निराश न करता बुमराहने पहिल्या डावात इंग्लंडच्या 6 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि दुसऱ्या डावात बुमराहने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत 3 बळी घेतले. बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळेच भारताला विशाखापट्टणम कसोटी 106 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकण्यात यश आले. बुमराहकडून पुन्हा एकदा तिसऱ्या कसोटी सामन्यात विजयी गोलंदाजीची अपेक्षा असेल.

जसप्रीत बुमराहची कारकीर्द

जसप्रीत बुमराहने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून बुमराहने भारतासाठी 89 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये बुमराहने 149 विकेट घेतल्या आहेत. वनडेनंतर बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 कारकिर्दीची सुरुवात केली.

तेव्हापासून या उत्कृष्ट वेगवान गोलंदाजाने भारतासाठी 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 74 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून बुमराहने भारतासाठी 34 कसोटी सामने खेळले आहेत. बुमराहने भारताकडून आतापर्यंत 155 विकेट घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT