Nitin Menon Dainik Gomantak
क्रीडा

'किस्मत का ताला खुला', ICC ने दिली या भारतीय अम्पायरला गूड न्यूज

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारताच्या नितीन मेनन यांना ICC एलिट पॅनेलमधील कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवला आहे.

दैनिक गोमन्तक

ICC Elite Panel Umpire: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारताच्या नितीन मेनन (Nitin Menon) यांना ICC एलिट पॅनेलमधील कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवला आहे. या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत ते न्यूट्रल अम्पायर म्हणून पदार्पण करणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयसीसीने एलिट पॅनेलमधील मेनन यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवला आहे. (icc retains indian umpire nitin menon in elite panel set for maiden neutral umpire appearance in sri lanka)

या भारतीय अम्पायरचे नशीब उघडले

इंदूरचे (Indore) 38 वर्षीय अम्पायर नितीन मेनन ICC च्या एलिट पॅनेलच्या 11 सदस्यांपैकी एकमेव भारतीय आहेत. आयसीसीने अलीकडेच मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गेली तीन-चार वर्षे ते आमचे मुख्य अम्पायर आहेत. या महिन्याच्या अखेरीस ते न्यूट्रल अम्पायर म्हणून काम पाहतील.

आयसीसीने ही मोठी जबाबदारी दिली आहे

2020 मध्ये नितीन मेनन यांचा ICC च्या एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. एस वेंकटराघवन आणि एस रवी यांच्यानंतर एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारे ते तिसरे भारतीय ठरले आहेत. मेनन मात्र भारतातच (India) आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपले योगदान येऊ शकले. कोरोना निर्बंधामुळे आयसीसीने स्थानिक अम्पायर्संना देशांतर्गत मालिकेतील सामन्यांमध्ये काम करण्याची परवानगी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: ‘ग्रीन सेस’ मुद्द्यावर आलेमाओ यांनी केला मुद्दा उपस्थित

Goa Filmcity: गोवा फिल्म सिटीच्या नावाखाली 'बाहेरच्या' कलाकारांना, तंत्रज्ञांना प्रस्थापित करण्याची योजना तर नाही ना?

Goa Politics: विधानसभा कामकाजावेळी, सरकारी कार्यालयातील टेबले 'रिकामी' का असतात?

Team India Record: अखेर भारतानं करून दाखवलं! 148 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या नावावर असलेल्या 'या' विश्वविक्रमावर भारताचा कब्जा

Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

SCROLL FOR NEXT