Virat Kohali Dainik Gomantak
क्रीडा

ICC Rankings: किंग कोहलीला मोठा धक्का, 'या' नव्या खेळाडूची एन्ट्री; क्रमवारी बदलली

ICC Rankings: आयसीसीच्या नव्या क्रमवारीत यावेळी मोठे बदल पाहायला मिळत आहेत. रँकिंगमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला मोठा फटका बसला आहे.

Manish Jadhav

ICC Rankings: आयसीसीच्या नव्या क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. रँकिंगमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला मोठा फटका बसला आहे.

त्याचबरोबर या वेळी एका नव्या खेळाडूचा रँकिंगमध्ये प्रवेश झाला आहे. मात्र, पहिल्या पाच क्रमांकामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. दुसरीकडे, टी-20 क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे.

ICC ODI क्रमवारीत बाबर आझम नंबर वन फलंदाज, विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल टॉप 10 मध्ये

ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, बाबर आझम (Babar Azam) अजूनही नंबर 1 आहे. त्याचे रेटिंग आता 886 वर गेले आहे.

रॅसी व्हॅन डर डुसेन 777 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. त्यापाठोपाठ फखर जमान 755 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आणि इमाम-उल-हक 745 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. टॉप 4 मध्ये तीन पाकिस्तानचे खेळाडू आहेत.

यानंतर, जेव्हापासून टीम इंडियाच्या (Team India) शुभमन गिलने पाचव्या क्रमांकावर कब्जा केला आहे, तेव्हापासून त्याला येथून हटवणे कठीण झाले आहे. त्याचे 738 रेटिंग आहे. डेव्हिड वॉर्नर सहाव्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग 726 आहे.

दरम्यान, आयरिश खेळाडू हॅरी ट्रेक्‍टर टॉप 10 मध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला आहे. तो 722 रेटिंगसह थेट सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. याचा फटका विराट कोहलीला बसला आहे. कोहली आता 719 च्या रेटिंगसह आठव्या क्रमांकावर घसरला आहे.

त्याचवेळी, क्विंटन डिकॉकलाही एका स्थानाचा फटका बसला असून तो नवव्या क्रमांकावर घसरला आहे. टॉप 10 मध्ये रोहित शर्माचे स्थान अबाधित आहे. तो 707 च्या रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीनुसार

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीनुसार, जोश हेझलवूड अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 705 आहे.

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 691 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मिचेल स्टार्क 686 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. मॅट हेन्री 667 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे.

तर ट्रेंट बोल्ट 660 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. मोहम्मद सिराजशिवाय टीम इंडियाचा कोणताही खेळाडू टॉप 10 गोलंदाजांच्या यादीत नाही.

दुसरीकडे, एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, येथे शाकिब अल हसन नंबर 1 आहे. तो 367 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे.

मोहम्मद नबी 310 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राशिद खानचे रेटिंग 280 असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिकंदर रझा चार आणि झीशान मकसूद पाच क्रमांकावर आहेत. या यादीत टीम इंडियाचा एकही खेळाडू नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT