Team India X/BCCI
क्रीडा

SA vs IND: टीम इंडियावर ICC ची कारवाई! द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत झाली 'ही' चूक

ICC penalised Team India : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर आता आयसीसीनेही टीम इंडियावर एका चूकीसाठी कारवाई केली आहे.

Pranali Kodre

ICC penalised Team India after Centurion Test against South Africa:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात होत असलेली मालिका टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. दरम्यान, या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर आयसीसीने भारतीय संघावर कारवाई केली आहे.

सेंच्युरियनला झालेल्या कसोटी सामन्यात भारताला तिसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 डाव आणि 32 धावांची पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारताने 2 षटके नियोजित वेळेपेक्षा उशीरा टाकल्याने आयसीसीने दंड ठोठावण्याबरोबरच कसोटी चॅम्पियशीपचे गुणही कापले आहेत.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाकडून दोन षटके उशीरा टाकण्यात आले. त्याचमुळे भारतीय संघाला सामना शुल्काच्या 10 टक्के दंड आकारण्यात आला आहे. त्याचबरोबर टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेतील 2 गुणही कापण्यात आले आहेत.

दरम्यान, विजयी टक्केवारीवनुसार या गुणतालिकेतील संघाचे स्थान निश्चित केले जाते. सध्या भारतीय संघ 38.89 च्या विजयी टक्केवारीसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघावरील कारवाई आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी मंजूर केली आहे.

काय आहेत नियम?

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाकडून खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचार संहितेतील कलम 2.22 चे उल्लंघन झाले आहे. हा कलम षटकांची गती कमी राखण्याबद्दल आहे. नियमित वेळेपेक्षा प्रत्येकी एका उशीरा टाकलेल्या षटकासाठी 5 टक्के दंड आकारला जातो.

याशिवाय आयसीसीच्या नियमानुसार टेस्ट चॅम्पियनशीपमधील सामन्यात नियमित वेळेपेक्षा उशीरा टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक षटकासाठी एक गुण कापला जातो. ज्याचा परिणाम विजयी टक्केवारीवर देखील होतो.

यानुसार भारताने दोन षटके उशीराने टाकल्याने 2 गुण कापण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर 16 गुणांसह आणि 44.44 टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर होते.

मात्र शुक्रवारी (29 डिसेंबर) आयसीसीने कारवाई केल्याने भारताचे आता 14 गुण झाले आहेत, तसेच टक्केवारीही 38.89 अशी घसरली आहे. त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.

भारताच्या आधी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान अशा संघांवरही षटकांची गती कमी राखल्याबद्दल कारवाई झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे 10, तर इंग्लंडचे तब्बल 19 गुण कापण्यात आले आहेत. पाकिस्तानचेही 2 गुण कापण्यात आलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT