Cricket Rules Twitter
क्रीडा

World Cup 2023: सामना टाय झाला, तर काय होणार? कोणते आहेत नवे नियम, जाणून घ्या

Cricket Rules: वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी तीन महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 Rules:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेला गुरुवार (5 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. त्यामुळे पुढचे 46 दिवस क्रिकेटचा महासंग्राम अनुभवण्यासाठी क्रिकेट चाहते आतुर आहेत. पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात होणार आहे.

दरम्यान, पहिलाच सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असल्याने अनेकांना 2019 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याची आठवण आली असेल. याच दोन संघात 14 जुलै 2019 रोजी अंतिम सामना पार पडला होता. वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांमध्ये हा सामना गणला गेला.

वर्ल्डकप 2019 च्या अंतिम सामन्यात 50-50 षटकांनंतर बरोबरी झाली होती, त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यानंतर बाउंड्री काउंटच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे इंग्लंडने पहिल्यांदा वनडेचे विश्वविजेतेपद जिंकले, तर न्यूझीलंड उपविजेते राहिले.

मात्र या सामन्यानंतर बाउंड्री काउंटच्या नियमावर प्रचंड टीका झाली, अखेर हा नियम बदलण्यात आला.

असा आहे नवा नियम

दरम्यान, आता सामना बरोबरीत सुटला तर बाउंड्री काउंटचा नियम रद्द करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार जर सामना निर्धारित षटकांनंतर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पण जर पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली, तर जोपर्यंत विजेता संघ मिळत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहेत.

हे नियमही बदलले

दरम्यान वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सॉफ्ट-सिग्नलचाही नियम काढून टाकण्यात आला आहे. यापूर्वी तिसऱ्या पंचांकडे जेव्हा खेळाडू बाद की नाबाद तपासण्यासाठी जायचा, तेव्हा मैदानावरील पंचांना बाद की नाबाद याबद्दल सॉफ्ट सिग्नल द्यावा लागत होता. त्यावेळी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्यासाठी तिसऱ्या पंचांना निर्णयकारक पुरावे असणे आवश्यक होते.

मात्र, आता त्यामुळे आता बदललेल्या नियमानुसार ज्यावेळी विकेट तपासण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांवर येईल, तेव्हा त्यांनांच अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. मैदानावरील पंच कोणत्याही प्रकारे सॉफ्ट सिग्नल देणार नाहीत.

याशिवाय वर्ल्डकप 2023 सामन्यांसाठी मैदानावरी बाऊंड्री लाईन 70 मीटरपेक्षा लहान नसणार आहे. प्रत्येक मैदानातील बाउंड्री लाईन ही कमीत कमी 70 मीटर अंतरावर असणे आवश्यक असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT