India vs Pakistan | World Cup 2023 
क्रीडा

इतिहास घडला! IND vs PAK सामना व्ह्युवरशिपमध्येही नंबर वन; 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिला महामुकाबला

World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने व्ह्युवरशिपबाबतही इतिहास घडवला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan, Viewership Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी 12 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. हा बहुप्रतिक्षित सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयासह भारताने तीन सामन्यांनतर गुणतालिकेत सध्या अव्वल क्रमांकही पटकावला आहे. दरम्यान, या सामन्याने आणखी एक खास विक्रम मोडला आहे.

भारत आणि पाकिस्तान संघात झालेला हा सामना डिज्नी प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 3.5 कोटी युजर्सने एकाचवेळी पाहिला. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या इतिहासात क्रिकेट सामन्याला मिळालेले हे सर्वाधिक युजर्स आहेत.

या सामन्याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या विक्रमाला मागे टाकले आहे. यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झालेला आयपीएलचा अंतिम सामन्याला जिओ सिनेमावर 3.2 कोटी लोकांनी पाहिले होते.

तसेच गेल्या महिन्यात आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही  डिज्नी प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 2.8 कसोटी युजर्सने एकाचवेळी पाहिला होता.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हॉटस्टारवर यंदा वर्ल्डकपचे सामने मोबाईलवर मोफत पाहाता येत आहेत. त्यामुळे चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, शनिवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, पाकिस्तान संघ 42.5 षटकांमध्ये 191 धावांत सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 30.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या आणि हसन अलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT