Team India Best Fielder BCCI
क्रीडा

Team India Video: 'लाईट्स ऑफ अन्...' लखनऊच्या स्टेडियमवर झळकला टीम इंडियाचा 'बेस्ट फिल्डर'

Team India Best Fielder: वर्ल्डकप 2023 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाच्या फिल्डींग कोचने हटके पद्धतीने ड्रेसिंग रुममध्ये बेस्ट फिल्डर मेडल विजेत्याची घोषणा केली.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs England, Best Fielder Video:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी सामना झाला. लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 100 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या विजयानंतर अनेक चाहत्यांना भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये या सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक कोणाला मिळणार याची उत्सुकता होती.

अखेर बीसीसीआयने सोमवारी सकाळी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी या सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलची निवड केली.

खरंतर या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येक सामन्यानंतर संघातील एका खेळाडूची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्याकडून सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवड करण्याची परंपरा सुरू झाली आहे.

तसेच प्रत्येकवेळी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाच्या पदकाच्या विजेत्याची घोषणा वेगवेगळ्या प्रकारे केली जात आहे. कधी टीव्हीवर, कधी स्टेडियममधील स्क्रिन, तर कधी स्पायडर कॅमच्या मदतीने विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे.

यानुसारच रविवारी भारत विरुद्ध इग्लंड सामन्यानंतरही टी दिलीप यांनी केएल राहुलचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाच्या पदकाच्या विजेत्याची घोषणा केली. पण यावेळी लखनऊमधील स्टेडियवर लाईट शो करत केएल राहुलच्या नावाची घोषणा झाली.

या लाईट शो मधून जर्सीची प्रतिमा तयार करण्याच आली, ज्यावर राहुलचे नाव आणि त्याचा जर्सी क्रमांक 1 होता. त्याच्या नावाची घोषणा होताच भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला.

दरम्यान, केएल राहुलच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी टी दिलीप यांनी राखीव क्षेत्ररक्षक म्हणून योगदान दिलेल्या इशान किशनचे आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या क्षेत्ररक्षणाचेही कौतुक केले. त्याचबरोबर भारतीय संघाने मैदानात दाखवलेल्या उर्जेबद्दलही त्यांनी विशेष कौतुक करताना वेगवान गोलंदाजांवरही स्तुतीसुमने उधळली.

तसेच केएल राहुलच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी त्यांनी स्पष्ट केले की हे पदक केवळ एका चांगल्या झेलासाठी किंवा फक्त धावा रोखण्यासाठी नाही, तर मैदानात दाखवलेल्या जिद्दीसाठी, मैदानावर त्या क्षेत्ररक्षणाचा मोठा फरक पाडण्यासाठीही आहे.

केएल राहुलने या सामन्यात चांगले यष्टीरक्षण केले होते. त्याने अनेक चांगले चेंडू थांबवण्याबरोबरच एक झेल घेतला आणि एक यष्टीचीतही केले. केएल राहुलला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक वर्ल्डकप 2023 मध्ये भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये दुसऱ्यांदा मिळाले. त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतरही हे पदक मिळाले होते.

रविवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 229 धावा केल्या होत्या. त्यानंतर 230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 34.5 षटकात 129 धावांतच सर्वबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT