Team India 
क्रीडा

World Cup 2023: भारत - बांगलादेश सामन्यात पावसाची आडकाठी? असे आहेत पुण्यातील हवामान अंदाज

IND vs BAN: भारत विरुद्ध बांगलादेश संघात पुण्यामध्ये गुरुवारी सामना होणार असून या दरम्यान कसे हवामान असेल, जाणून घ्या.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Bangladesh, Pune Weather Update:

गुरुवारी (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १७ वा सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दुपारी २ वाजता सुरू होणार आहे.

दरम्यान, वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील मागील काही सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आलेला आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या सामन्यादरम्यान देखील पाऊस व्यत्यय आणणार का, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला असेल.

हवामान अंदाजानुसार गुरुवारी पुण्यात पावसाची शक्यता अगदी नगण्य आहे. पण वातावरण ढगाळ असू शकते. त्यामुळे हा सामना पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. Accuweather च्या रिपोर्टनुसार दिवसा पुण्यातील तापमान 33 डिग्री सेल्सियस असेल, . तसेच रात्री हे तापमान 23 डिग्री सेल्सियस असू शकते. त्याचबरोबर रिपोर्ट्सनुसार 41 टक्के हवेत आद्रता असू शकते.

कशी असेल खेळपट्टी?

पुण्यात आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांनुसार खेळपट्टी फलंदाजीला पोषक राहिली आहे. या स्टेडियममध्ये 300 धावांच्यावरही अनेकदा संघांनी धावा केल्या आहेत, तसेच या धावांचे आव्हानही पार झाले आहे.

त्यामुळे गुरुवारीही ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याचे अंदाज आहेत. दरम्यान, वर्ल्डकप 2023 मधील पुण्यात पहिलाच सामना गुरुवारी खेळला जाणार असल्याने अद्याप ही खेळपट्टी ताजी असणार आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाजांनाही फायदा मिळू शकतो.

दरम्यान, भारताचा आणि बांगलादेशचा हा या स्पर्धेतील हा चौथा सामना आहे. दरम्यान या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजीत राहिला आहे, तर बांगलादेशने 3 पैकी एक सामना जिंकला आहे, तर 2 सामने पराभूत झाले आहेत.

त्यामुळे भारतीय संघ आपली विजयी लय कायम ठेवण्यासाठी, तर बांगलादेश पुन्हा विजयी पथावर परण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • बांगलादेश - शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन मेहमूद , शरीफुल इस्लाम , तनझिम हसन साकीब.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT