India vs Bangladesh Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: भारत-बांगलादेश पुण्यात येणार आमने-सामने! कसा आहे 'हेड टू हेड' रेकॉर्ड, जाणून घ्या

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश संघात गुरुवारी वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना होत आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Bangladesh, Head to Head record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी 17 वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

हा भारताचा आणि बांगलादेशचा या स्पर्धेतील हा चौथा सामना आहे. दरम्यान या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजीत राहिला आहे, तर बांगलादेशने 3 पैकी एक सामना जिंकला आहे, तर 2 सामने पराभूत झाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही काळात बांगलादेशने भारतासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. तथापि, या दोन संघातील आत्तापर्यंतची आमने-सामने आकडेवारी कशी राहिली आहे, याकडे एक नजर टाकू.

भारत आणि बांगलादेश हे दोन संघ आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 40 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील ३१ सामने भारताने जिंकले आहेत, तसेच 8 सामने बांगलादेशने जिंकले आहेत. त्याचबरोबर १ सामन्याचा निकाल लागलेला नाही.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशने जिंकलेल्या 8 सामन्यांपैकी 3 सामने गेल्या वर्षभरात जिंकले आहेत. २०१९ पासून भारत आणि बांगलादेश 5 वेळा आमने-सामने आले आहेत, त्यातील 3 वेळा बांगलादेशने विजय मिळवला आहे. भारताच्यादृष्टीने ही गोष्ट नक्कीच चिंताजनक असणार आहे.

तसेच या दोन संघात अखेरचा वनडे सामना आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीत झाला होता, ज्यात बांगलादेशने 6 धावांनी विजय मिळवला होता.

तसेच वर्ल्डमधील आमने-सामने आकडेवारी लक्षात घ्यायची झाल्यास 4 वेळा भारत आणि बांगलादेश आमने-सामने आले आहेत. त्यातील एकदा बांगलादेशने विजय मिळवला आहे, तर 3 वेळा भारताने बाजी मारली आहे. भारताला वनडे वर्ल्डकपमध्ये 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकमेव पराभव स्विकारावा लागला होता.

आता हे दोन संघ पुन्हा गुरुवारी वर्ल्डकपमध्ये आमने-सामने येणार आहेत. त्यांच्या कोण बाजी मारणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • बांगलादेश - शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन मेहमूद , शरीफुल इस्लाम , तनझिम हसन साकीब.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT