India vs Afghanistan ICC
क्रीडा

World Cup 2023: दिल्लीत भारत-अफगाणिस्तान येणार आमने-सामने! पाहा दोन्ही संघांचा 'हेड-टू-हेड' रेकॉर्ड

India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीमध्ये वर्ल्डकप 2023 मधील सामना बुधवारी रंगणार आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Afghanistan, Head to Head Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होईल.

हा सामना भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते, तर अफगाणिस्तानला बांगलादेशकडून पराभवाचा धक्का बसला होता.

दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान यांची वनडे क्रिकेटमधील आमने-सामने आकडेवारी कशी आहे, याकडे एक नजर टाकू.

भारत आणि अफगाणिस्तान वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत केवळ 3 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील 2 सामने भारताने जिंकले आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. या तीन सामन्यांपैकी एक सामना 2019 वर्ल्डकपमध्ये 22 जून रोजी साऊथॅम्पटन येथे झाला होता. या रोमांचक सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला होता, ज्यात मोहम्मद शमीने हॅट्रिक घेतली होती.

तसेच त्याआधी 5 मार्च 2014 मध्ये भारताचा अफगाणिस्तानविरुद्ध पहिला वनडे सामना झाला होता. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच 25 सप्टेंबर 2018 मध्ये आशिया चषकात भारत आणि अफगाणिस्तान संघात सामना झाला होता, जो बरोबरीत सुटला होता.

सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणारे खेळाडू

वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून अफगाणिस्तानविरुद्ध केएल राहुलने सर्वाधिक 90 धावा केल्या आहेत, तर अफगाणिस्तानकडून भारताविरुद्ध सर्वाधिक 146 धावा मोहम्मद शेहजादने केल्या आहेत.

तसेच भारताकडून अफगाणिस्ताविरुद्ध रविंद्र जडेजाने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या आहेत, तर अफगाणिस्तानकडून भारताविरुद्ध मोहम्मद नबीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT