India vs Australia | Cricket World Cup 2023 Final 
क्रीडा

World Cup 2023: प्रेक्षकांनी रचला इतिहास! तब्बल 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिली फायनल, जय शाह यांची माहिती

India vs Australia Final: अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या वर्ल्डकप 2023 फायनलला रेकॉर्डब्रेक प्रेक्षकसंख्या मिळाली.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 Final, India vs Australia, TV Viewership:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवत विक्रमी सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले.

दरम्यान, या सामन्यावेळी प्रेक्षकांनीही अनोखा विक्रम रचला आहे. याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या टेलिव्हिजन इतिहासात वर्ल्डकपमधील अंतिम सामना हा सर्वाधिक पहिला गेलेला सामना ठरला आहे.

जय शाह यांनी केलेल्या ट्वीटनुसार वर्ल्डकपचा अंतिम सामना टीव्हीवर 30 कोटी चाहत्यांनी पाहिला. तसेच त्यांनी अशीही माहिती दिली की डिजीटल प्लॅटफॉर्मवरही या सामन्याला सर्वाधिक व्ह्युवरशीप मिळाली.

त्यांनी ट्वीट केले आहे की 'टीव्हीवर वर्ल्डकप 2023चा अंतिम सामना तब्बल 30 कोटी चाहत्यांनी पाहिला, त्यामुळे हा भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला कार्यक्रम ठरला आहे.

तसेच टीव्हीवर एकाचवेळी सर्वाधिक 13 कोटी चाहत्यांनी हा सामना पाहण्याचाही इतिहास रचला गेला. (डिजीटलवर या सामन्याला एकाचवेळी 5.9 कोटी युजर्सची व्ह्युवरशीप मिळाली, हा देखील एक विश्वविक्रम आहे.).'

त्यांनी पुढे चाहत्यांचे आभार मानताना लिहिले, 'या खेळासाठी चाहत्यांमध्ये असलेले प्रेम आणि आवड पाहून आम्ही त्याबद्दल विनम्रता व्यक्त करतो. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आभार.'

दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये सातत्याने सामन्यांना टीव्ही आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्ह्युवरशीप मिळताना दिसली आहे.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय

रविवारी झालेल्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या.

भारताकडून केएल राहुलने 66 धावांची आणि विराट कोहलीने 54 धावांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. ऑस्ट्रेलिया सुरुवातीला 47 धावात 3 विकेट्स गमावल्याने अडचणीत सापडले होते. पण नंतर सलामीवीर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले.

ट्रेविस हेडने 120 चेंडूत 15 चौकार 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. तसेच लॅब्युशेनने 110 चेंडूत नाबाद 58 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT