Devon Conway - Rachin Ravindra ANI
क्रीडा

World Cup 2023: ऑस्ट्रेलिया, भारत अन् इंग्लंड...चार वर्ल्डकप एक योगायोग! पहिल्याच सामन्यात ठरला विश्वविजेता?

England vs New Zealand: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यानंतर एका योगायोगाची चर्चा सुरू असून हा योगायोग विश्वविजेतेपद मिळवण्याबाबत आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, England vs New Zealand, 1st Century coincidence:

क्रिकेट वर्ल्डकप 2023 स्पर्धेला गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झाली. हा सामना न्यूझीलंडने 9 विकेट्सने जिंकला.

दरम्यान, पहिल्याच सामन्यानंतर एका योगायोगाची चर्चा जोरदार सुरू झाली. हा योगायोग विश्वविजेतेपद मिळवण्याबाबत आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात इंग्लडने दिलेल्या 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून रचिन रविंद्र आणि डेवॉन कॉनवे यांनी शतके केली. अष्टपैली रचिनने नाबाद 123 धावांची खेळी केली, तर सलामीवीर कॉनवेने नाबाद 152 धावा केल्या.

कॉनवेने आधी शतक पूर्ण केले, त्यापाठोपाठ रचिननेही शतकी धमाका केला. त्यामुळे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिले शतक करण्याचा विक्रम कॉनवेच्या नावावर झाला, तर दुसरे शतक रचिनच्या नावावर झाले.

त्याचमुळे एका योगायोगाची चर्चा सुरू झाली. हा योगायोग म्हणजे २००७ वर्ल्डकपपासून स्पर्धेत पहिले शतक ज्या संघाच्या खेळाडूने केले आहे, त्या संघाने विश्वविजेतेपद जिंकले आहे. हा योगायोग गेल्या चारही वर्ल्डकपमध्ये पाहायला मिळाला आहे.

साल 2007 मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज संघात झाला असला, तरी या सामन्यात कोणालाही शतक करता आले नव्हते. मात्र त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड सामन्यात या स्पर्धेतील पहिले शतक पाहायला मिळाले होते.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार रिकी पाँटिंगने 113 धावांची खेळी करत स्पर्धेतील पहिले शतक झळकावले होते. दरम्यान, 2007 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप उंचावला होता.

साल 2011 मध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत पहिले शतक पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाले होते. त्यावेळी पहिला सामना भारत आणि बांगलादेश संघात झाला होता.

या सामन्यात भारताचा सलामीवीर विरेंद्र सेहवागने 175 धावांची खेळी केली होती. याच सामन्यात विराट कोहलीनेही 100 धावांची खेळी केली होती. त्यामुळे या स्पर्धेतील पहिले शतक सेहवागच्या नावावर आणि दुसरे शतक विराटच्या नावावर झाले होते. त्यावर्षी भारताने विश्वविजेतेपद जिंकले होते.

साल 2015 साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात झाला होता, पण पहिले शतक ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाहायला मिळाले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंचने 135 धावांची खेळी केली होती. हे स्पर्धेतील पहिले शतक होते. हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

त्यानंतर 2019 साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत तर पहिल्या पाचही सामन्यात एकही शतक झाले नव्हते. पण इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या सहाव्या सामन्यात जो रुटने १०७ धावांची खेळी केली होती. हे या स्पर्धेतील पहिले शतक होते. हा वर्ल्डकप इंग्लंडने जिंकला होता.

दरम्यान, हा योगायोग पाहाता आता न्यूझीलंड वर्ल्डकप 2023 जिंकण्याचे संकेत मिळाले असल्याचे म्हटले जात आहे. कारण न्यूझीलंडच्या कॉनवे आणि रचिन यांनी शतकांची मोहोर पहिल्याच सामन्यात उमटवली आहे.

विशेष म्हणजे 12 वर्षांपूर्वी जेव्हा भारत वर्ल्डकप स्पर्धेचा दावेदार होता, तेव्हाही सामन्याच्या पहिल्याच सामन्यात सेहवाग आणि विराट यांची दोन शतके पाहायला मिळाली होती आणि आता वर्ल्डकप 2023 स्पर्धाही भारतात होत असून पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दोन शतके झाली आहेत.

याचमुळे न्यूझीलंडही हा योगायोग साधणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. जर न्यूझीलंडने खरंच वर्ल्डकप 2023 स्पर्धा जिंकली, तर सलग पाचव्या वर्ल्डकप स्पर्धेत हा योगायोग खरा ठरताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

Pooja Naik: 'देसाई, पार्सेकरांना पैसे दिल्‍याचे पुरावे माझ्‍या मोबाईलमध्‍ये'! पूजा नाईकचा दावा; Special Interview

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

SCROLL FOR NEXT