R Ashwin & Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Rankings मध्ये अश्विन-अय्यरची गगनभरारी, बांगलादेश मालिकेचा झाला फायदा

ICC Latest Test Rankings: रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत बरीच प्रगती केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

R Ashwin And Shreyas Iyer ICC Latest Test Rankings: मीरपूर येथे बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचे नायक ठरलेल्या रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत बरीच प्रगती केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. रविचंद्रन अश्विनला (R Ashwin) गोलंदाजीसोबतच अष्टपैलूंच्या क्रमवारीतही फायदा झाला आहे.

रविचंद्रन अश्विनची गगनभरारी

बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) मिरपूर सामन्यात सहा विकेट घेणारा रविचंद्रन अश्विन (R Ashwin) जसप्रीत बुमराहसह गोलंदाजांमध्ये संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने दुसऱ्या डावात नाबाद 42 धावा केल्या, ज्याच्या मदतीने तो फलंदाजांच्या क्रमवारीत 84 व्या स्थानावर पोहोचला. रवींद्र जडेजा 369 रेटिंग गुणांसह अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर रविचंद्रन अश्विन (R Ashwin) 343 गुणांसह आहे.

श्रेयस अय्यर कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंगवर पोहोचला

अश्विनसोबत 71 धावांची भागीदारी करणारा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कारकिर्दीतील सर्वोत्तम 16 व्या क्रमांकावर पोहोचला. प्लेअर ऑफ द सिरीज असूनही चेतेश्वर पुजारा तीन स्थानांनी घसरुन 19 व्या स्थानावर आहे, तर विराट कोहली दोन स्थानांनी घसरुन 14 व्या स्थानावर आहे. फलंदाजांमध्ये ऋषभ पंत सहाव्या तर गोलंदाजांमध्ये उमेश यादव 33 व्या स्थानावर आहे. बांगलादेशचा फलंदाज लिटन दास कारकिर्दीतील सर्वोत्तम 12 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर मोमिनुल हक 68 व्या, झाकीर हसन 70 व्या आणि नुरुल हसन 93 व्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT