आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटवर पेनल्टी आकारण्याचा नियम आयसीसीने लागू केला आहे. तसेच, सामन्यादरम्यान ड्रिंक्स इंटरव्हल घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. हे नियम जानेवारी 2022 पासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, जर एखादा संघ ओव्हर रेटमध्ये निर्धारित वेळेपेक्षा मागे असेल, तर उर्वरित षटकांमध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर उभा राहू शकणार नाही. त्याला 30 यार्डच्या त्रिज्येत उभे राहावे लागेल. सध्या पॉवरप्लेनंतर पाच क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर राहू शकतात. मात्र नवीन नियमानुसार संघाची चूक असेल तर केवळ चार क्षेत्ररक्षक बाहेर राहू शकतील.
आयसीसीने (ICC) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओव्हर रेटचे नियम आधीच ठरलेले आहेत. या अंतर्गत, क्षेत्ररक्षण करणारा संघ शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू निर्धारित वेळेत टाकण्याच्या स्थितीत असावा. जर ते हे करु शकले नाहीत, तर उर्वरित षटकांमध्ये त्यांच्याकडे 30 यार्डच्या बाहेर एकापेक्षा कमी क्षेत्ररक्षक असतील. आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशीनुसार हे बदल लागू करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Bord) आयोजित केलेल्या द हंड्रेड स्पर्धेत असा नियम पाहून त्याने विचार केला. सर्व फॉरमॅटमध्ये खेळाचा वेग सुधारण्यासाठी हे केले गेले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.