T20 World Cup  Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2024 स्पर्धेचे सामने 'या' तीन ठिकाणी खेळले जाणार; ICC कडून शिक्कामोर्तब

T20 World Cup 2024: आयसीसीने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील सामन्यांच्या आयोजनासाठी तीन ठिकाणांची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

ICC confirmed USA cities Dallas, Florida New York for ICC Men’s T20 World Cup 2024:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढीलवर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सामन्यांच्या आयोजनासाठी अमेरिकेतील तीन महत्त्वाच्या शहरांची घोषणा केली आहे. अमेरिकेत डेलास, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार डेलासमधील ग्रँड प्रेरी, फ्लोरिडामधील ब्रोवर्ड काउंटी आणि न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटीच्या मैदानात सामने होणार आहेत.

दरम्यान, 2021 मध्ये झालेल्या निर्णयानुसार टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत केले जाणार आहे. यातील आता अमेरिकेतील तीन ठिकाणे निश्चित झाली आहेत. अमेरिकेत पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकपचे सामने होणार आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील तिन्ही ठिकाणे विविध पर्यायांच्या मुल्यांकनानंतर निवडण्यात आली आहेत. या तिन्ही ठिकाणातील आकार, आसन क्षमता, मीडिया क्षेत्र अशा गोष्टींमध्ये सुधारणा केल्या जाणार आहे, या गोष्टी अंतिम करार करताना लक्षात घेतल्या जाणार आहेत.

20 संघात रंगणार वर्ल्डकप

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जूनमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.

टी20 वर्ल्डकप 2022 मधील पहिले 8 संघ म्हणजेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याबरोबरच टी20 क्रमवारीत पहिल्या 10 संघांमध्ये असेलल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना थेट पात्रता मिळाली आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे यजमान असल्याने त्यांनाही थेट पात्रता मिळाली आहे. याशिवाय पापुआ न्यू गिनी (PNG) संघाने इस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफिकेशनमधून पात्रता मिळवली आहे, तर आयर्लंड आणि स्कॉटलंड युरोप रिजन क्वालिफायरमधून पात्र ठरले आहेत.

आता अमेरिका क्वालिफायर, आफ्रिका क्वालिफायर आणि आशिया क्वालिफायरमधून आणखी ५ संघ पात्र ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT