ICC Dainik Gomantak
क्रीडा

ICC Change World Cup Venue: 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचे ICC ने बदलले ठिकाण, श्रीलंकेला दुसरा मोठा झटका!

World Cup Venue: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने श्रीलंकेला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.

Manish Jadhav

ICC Change World Cup Venue: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने श्रीलंकेला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. 2024 च्या अंडर-19 विश्वचषकाच्या यजमानपदापासून श्रीलंकेला आता वंचित रहावे लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आता दक्षिण आफ्रिकेत या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. श्रीलंका क्रिकेटमधील प्रशासकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयसीसी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेला 11 दिवसांत दुसरा 440 व्होल्टचा धक्का बसला आहे. आयसीसीने यापूर्वी 10 नोव्हेंबर रोजी सरकारी हस्तक्षेपामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे (एसएलसी) सदस्यत्व निलंबित केले होते.

आता पुढील विश्वचषक कुठे होणार आहे ते जाणून घ्या

दरम्यान, आयसीसीने (ICC) पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा व्हेन्यू बदलून दक्षिण आफ्रिका केला आहे. यापूर्वी हा विश्वचषक श्रीलंकेत होणार होता, मात्र आता दक्षिण आफ्रिकेत विश्वचषक होणार आहे. T20 क्रिकेट विश्वचषकाशिवाय पुढील वर्षी 19 वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे. श्रीलंका क्रिकेटमधील प्रशासकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयसीसी क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेच्या संघाला खेळण्याची परवानगी दिली

दुसरीकडे, आयसीसीने श्रीलंकन ​​क्रिकेट बोर्डाच्या निलंबनाचा नुकताच घेतलेला निर्णय कायम ठेवला, पण श्रीलंकेच्या अंडर-19 संघाला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी असेल. अंडर-19 विश्वचषक 14 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, त्यासाठी ठिकाण बदलण्यात आले आहे.

श्रीलंकेसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. जर ही स्पर्धा श्रीलंकेत (Sri Lanka) झाली असती तर श्रीलंकेच्या खेळाडूंना त्यांच्याच खेळपट्टीवर खेळण्याचा फायदा मिळाला असता, पण ठिकाण बदलल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

''माझी साथ विसरलास का?'', विराटच्या प्रेमात बनवली रील, कोहलीला 'बेवफाह' म्हणणाऱ्या पोस्टवर अनुष्काची लाईक; Video

Video: गोवा किंवा देशात पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही, तरुणांनी शांत राहावे; मायकल लोबो

SCROLL FOR NEXT