Major IPL Rule in International Crick Dainik Gomantak
क्रीडा

International Cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयपीएलच्या खास नियमाची एन्ट्री! 'बॅट गॉज' आणण्याचा आयसीसीचा प्लॅन; फलंदाजांवर आता करडी नजर

Major IPL Rule in International Cricket: आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या नियमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली.

Manish Jadhav

Major IPL Rule in International Cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेट अधिक पारदर्शक आणि संतुलित बनवण्यासाठी नवनवे नियम सातत्याने अमलात आणले जात असून, आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या नियमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली. फलंदाजांच्या बॅटच्या आकारावरुन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला.

फलंदाजांकडून निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आकाराच्या बॅटचा वापर होऊ नये, यासाठी मैदानावरच बॅटची तपासणी करणारी ‘बॅट गॉज’ प्रणाली लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनिवार्य केली जाऊ शकते.

आयपीएलमध्ये (IPL) गेल्या हंगामात या नियमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर आता जागतिक स्तरावरही तो राबवण्याची तयारी सुरु झाली. सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या पुरुष क्रिकेट समितीने ‘बॅट गॉज’चा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू करण्याची शिफारस केली होती. बाली येथे नुकत्याच पार पडलेल्या आयसीसीच्या बैठकीत मुख्य समितीने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती समोर येत असून, लवकरच पंचांना याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

एमसीसीच्या नियमांनुसार बॅटची कमाल रुंदी 4.25 इंच, जाडी 1.56 इंच आणि कडेची खोली 2.64 इंच इतकी मर्यादित असून, याच निकषांवर ‘बॅट गॉज’च्या माध्यमातून प्रत्येक फलंदाजाच्या बॅटची अचूक तपासणी केली जाणार आहे.

अलिकडच्या काळात टी-20 आणि विशेषतः आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडत असल्याचे चित्र असून, प्रत्येक सामन्यात सरासरी 19.27 षटकार मारले जात असल्याची नोंद आहे. आयपीएलमध्ये बॅट तपासणी सुरु झाल्यानंतर सुनील नरेन, रवींद्र जडेजा आणि रियान पराग यांसारख्या नामवंत खेळाडूंनाही गॉजमधून बॅट न गेल्याने आपली बॅट बदलावी लागली होती. याशिवाय, एज ग्रुप क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चेंडूंचा वापर करण्याचा सल्लाही समितीने दिला; मात्र मर्यादित षटकांच्या प्रमुख स्पर्धांमध्ये सध्याचा कुकाबुरा चेंडू कायम राहणार असून, नवीन चेंडूचा वापर केवळ संशोधनापुरताच मर्यादित असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sparrow Conservation: चिमणीच्या अंड्यांसाठी अख्ख्या गावाने 35 दिवस वीज बंद ठेवली! सत्यघटनेवर आधारित 'कूदू'ची इफ्फीत चर्चा

Rahu Ketu Gochar: राहू-केतूचे गोचर ठरणार आव्हानात्मक; तूळ राशीच्या खर्चात वाढ, धनु राशीला आर्थिक चिंता तर मकर राशीने व्यवहारात राहावे सावध!

Institute Menezes Braganza: 150 वर्षांची सांस्कृतिक परंपरा! गोव्याच्या साहित्य-कला विश्वाचा आधार 'मिनेझीस ब्रागांझा'

Russia Nuclear Satellite: अवकाशात अण्वस्त्रसज्ज उपग्रह पाठवण्याच्या तयारीत रशिया? जर्मनीच्या गुप्तचर रिपोर्टने खळबळ; नाटो देशांची वाढली धाकधूक

Shirgaon Mining Impact: खाणकामातून हजारो कोटींची कमाई, पण गावाचे पाणी, शेती अन् रोजगार संकटात

SCROLL FOR NEXT