Jarvo 69 | India vs Australia  
क्रीडा

ICC ने उगारला कारवाईचा बडगा! IND vs AUS मॅचवेळी चेपॉकवर घुसखोरी करणाऱ्या 'जार्वो 69' वर 'बॅन'

ICC Banned ‘Jarvo 69’: वर्ल्डकप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान चेपॉकवर घुसखोरी करणाऱ्या जार्वोवर आयसीसीकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

ICC Banned ‘Jarvo 69’ from Attending Odi Cricket World Cup Matches:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) सामना झाला. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. दरम्यान, या सामन्याला सुरुवात झाली, तेव्हा जार्वो हा व्यक्ती चांगलाच चर्चेत आला होता, त्याच्यावर आता आयसीसीने कारवाई केली असल्याचे समजत आहे.

नक्की झाले काय?

झाले असे की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यासाठी खेळाडू मैदानात येत असताना डॅनिएल जार्विस हा व्यक्ती, जो 'जार्वो 69' म्हणून ओळखला जातो, तो भारतीय संघाची जर्सी घालून अचानक स्टेडियमची सुरक्षा भेदून मैदानात आला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांबरोबर विराट कोहली आणि केएल राहुललाही पुढे व्हावे लागले होते.

या घटनेनंतर आयसीसीने स्टेंटमेंट प्रसिद्ध केले, ज्यात जार्वोवर वर्ल्डकपमधील पुढच्या कोणत्याही सामन्यांसाठी मैदानात येण्यापासून बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली आहे.

याबद्दल आयसीसीच्या प्रवक्त्यांनी पीटीआयला सांगितले की 'आम्ही काय झाले आहे, याबद्दल त्या स्टेडियममधून माहिती घेतली आणि असे पुन्हा घडण्यापासून रोखळण्यासाठी कोणती अतिरिक्त सुरक्षेचे उपाय आवश्यक आहे का याचा विचार करत आहोत.'

'त्या संबंधित व्यक्तीला वर्ल्डकपमधील पुढील सामन्यांसाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे.'

कोण आहे जार्वो?

डॅनिएल जार्विस हा सर्वात आधी क्रिकेट वर्तुळात 2021 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यावेळी प्रकाशझोतात आला होता. तो त्यावेळी भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरू असताना अनेकदा सुरक्षा तोडत मैदानात घुसला होता.

त्यानंतर त्याच्यावर इंग्लंडमधील अनेक स्टेडियममध्ये येण्यापासून बंदीही घालण्यात आली होती. त्यावेळीही तो भारतीय संघाची जर्सी घालून आला होता. तसेच ओव्हलवर तो असाच अचानक घुसलेला असताना तो जॉनी बेअरस्टोला धडकला होता. यानंतर त्याला अटकही करण्यात आलेली.

दरम्यान जार्वो हा केवळ क्रिकेटमध्येच नाही, तर तो विविध खेळांच्या सामन्यादरम्यानही असाच अनेकदा मैदानात घुसला आहे. तो खेळांच्या मैदानात जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या घातलेल्या जर्सीवर जार्वो 69 (Jarvo 69) असते, त्याचमुळे त्याला त्या नावाने ओळखले जाते. तो इंग्लंडमधील एक सिरियल प्रँकस्टर म्हणूनही प्रसिद्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT