ICC Awards 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने ICC अवॉर्ड 2023 साठी निवडलेल्या खेळाडूंची दुसरी बॅच जाहीर केली आहे. या बॅचमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि म्हणूनच त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिलचा ICC मेन्स फलंदाजी क्रमवारी 2023 मध्ये समावेश करण्यात आला आहे. शुभमन गिलने 2023 मध्ये 1584 धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर त्याने दोनदा आयसीसीचा मेन्स प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड पटकावला आहे.
दरम्यान, या शर्यतीत शुभमन गिल सोबत विराट कोहली देखील आहे, ज्याने 2023 च्या ICC मेन्स क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्याने 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 शतके झळकावली. या यादीत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही समावेश आहे. मोहम्मद शमीने 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 43 विकेट घेतल्या आहेत. शमी हा ICC मेन्स क्रिकेट विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. या यादीत न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलचाही समावेश आहे. 2023 मध्ये त्याने न्यूझीलंडसाठी चांगली फलंदाजीही केली आहे.
दरम्यान, ICC वुमन्स वनडे क्रिकेटपटूच्या यादीत अनेक अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू नॅट सायव्हर ब्रंटचा पुन्हा एकदा समावेश झाला आहे. 2023 मध्ये तिने वनडेमध्ये तीन शतके झळकावली होती. या यादीत श्रीलंका संघाचा कर्णधार चमारी अटापट्टूचाही समावेश झाला आहे. सर्व चाहत्यांच्या वोटिंगचा कौल लक्षात घेता आयसीसी विजेत्या खेळाडूंची घोषणा करेल. ICC पुरस्कार 2023 च्या विजेत्याची घोषणा जानेवारी 2024 मध्ये केली जाईल.
विराट कोहली, शुभमन गिल, मोहम्मद शमी, डॅरिल मिशेल.
ऍशले गार्डनर, चामरी अटापट्टू, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट
मार्क चॅपमन, सिकंदर रझा, सूर्यकुमार यादव, अल्पेश रामजानी
चामारी अटापट्टू, सोफी एक्लेस्टोन, हेली मॅथ्यूज, एलिस पेरी
जेराल्ड कोएत्झी, यशस्वी जयस्वाल, दिलशान मदुशंका, रचिन रवींद्र
मारुफा अख्तर, लॉरेन बेल, डार्सी कार्टर, फोबी लिचफिल्ड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.