U19 Cricket World Cup Winners and Runner-up X/ICC
क्रीडा

U19 World Cup 2024: टीम इंडियाच्या चार खेळाडूंची स्पर्धेतील सर्वोत्तम संघात निवड, ICC ने केली घोषणा

U19 World Cup Team of the Tournament: आयसीसीने 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वोत्तम 12 जणांच्या संघाची निवड केली आहे. यामध्ये भारताच्या चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

Pranali Kodre

ICC announced U19 Men’s Cricket World Cup 2024 Team of the Tournament:

रविवारी (11 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेट संघाने 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय युवा संघाला 79 धावांनी पराभूत केले.

या सामन्यासह 19 वर्षांखालील वर्ल्डकपचे 15 वे पर्व संपले. त्यामुळे या सामन्यानंतर आयसीसीने यंदाच्या स्पर्धेतील सर्वोत्तम 12 जणांच्या संघाची निवड केली आहे. यामध्ये भारताच्या चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यात कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन धस आणि सौम्य पांडे यांची निवड झाली आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाच्या तीन, दक्षिण आफ्रिकेच्या दोन आणि पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड या देशांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा या संघात समावेश आहे.

अशी राहिलीये कामगिरी

दरम्यान, सलामीवीर म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या ल्युआन-ड्रे प्रीटोरियस आणि ऑस्ट्रेलियाचा हॅरी डिक्सन यांची निवड झाली आहे. प्रीटोरियस यष्टीरक्षकही आहे. त्याने या स्पर्धेत 6 सामन्यांत 287 धावा केल्या, तसेच 8 झेल घेतले. त्याचबरोबर डिक्सनने 7 सामन्यांत 309 धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या मुशीर खानने या स्पर्धेत 2 शतकांसह 7 सामन्यांत 360 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार ह्यु वेबगेन आहे. त्याने 7 सामन्यांत 304 धावा केल्या आहेत.

पाचव्या क्रमांकावर भारताचा कर्णधार उदय सहारनला संधी मिळाली असून तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 7 सामन्यांत 397 धावा केल्या. भारताकडून सचिन धस हा देखील शानदार खेळला. 7 सामन्यांत 303 धावा करणाऱ्या सचिन धसला सहाव्या क्रमांकावर संधी मिळाली आहे.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू नॅथन एडवर्डला सातव्या क्रमांकावर संधी देण्यात आली आहे. त्याने या स्पर्धेत 5 सामन्यांत 101 धावा केल्या आणि 11 विकेट्सही घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज कॅलम विडलर यालाही या संघात संधी मिळाली असून त्याने या स्पर्धेत 6 सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या आहेत.

6 सामन्यांत 18 विकेट्स घेणाऱ्या पाकिस्तानच्या उबैद शाह यानेही या संघात जागा मिळवली आहे. तो पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहचा धाकटा भाऊ आहे. या स्पर्धेत सर्वाधिक २१ विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाही या संघात आहे.

त्याचबरोबर भारताचा गोलंदाज सौम्य पांडेनेही या संघात संधी मिळावली आहे. त्याने 7 सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या आहेत. 12 वा खेळाडू म्हणून स्कॉटलंडच्या जॅमी डंक याला संधी देण्यात आली आहे. त्याने 4 सामन्यांत 263 धावा केल्या.

  • आयसीसीचा 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 चा सर्वोत्तम संघ - ल्युआन-ड्रे प्रीटोरियस, हॅरी डिक्सन, मुशीर खान, ह्यु वेबगेन, उदय सहारन, सचिन धस, नॅथन एडवर्ड, कॅलम विडलर, उबैद शाह, क्वेना मफाका, सौम्य पांडे, जॅमी डंक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT