India women's blind cricket Dainik Gomantak
क्रीडा

IBSA World Games: भारतीय महिलांना ऐतिहासिक सुवर्ण यश, पण पुरुष संघाचा पाकिस्तानकडून फायनलमध्ये पराभव

आयबीएसए वर्ल्डकप गेम्स २०२३ स्पर्धेत भारतीय अंध महिला संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर भारतीय पुरुष संघाला रौप्य पदकावर समाधान मानेवे लागले.

Pranali Kodre

IBSA World Games 2023 India women's blind cricket team won gold medal:

आयबीएसए वर्ल्डकप गेम्स 2023 स्पर्धेत पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे अंध महिला व पुरुष संघ पोहचले होते. दरम्यान महिला संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे, तर पुरुष संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

महिला संघाला सुवर्णपदक

शनिवारी अंतिम टी20 सामन्यात भारतीय अंध महिला संघाने एजबस्टनला ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 9 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे भारतीय महिला संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले.

ऑस्ट्रेलिया महिला संघाला प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 115 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यानंतर सलामीला फलंदाजी करणी निलाप्पा 8 धावांवर असताना आणि दिपिकाने 11 चेंडूत 18 धावा केलेल्या असताना पावसामुळे सामना थांबला. त्यालेळी भारताचे 3.3 षटकात 43 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने विजय मिळवला.

पुरुष संघाला रौप्यपदक

पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तान संघाविरुद्ध झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तान पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले. पण भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

भारतीय संघाने दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने 15 षटकांच्या आतच पुर्ण केला.

नरेंद्र मोदींकडून कौतुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले.

त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की 'आयबीएसए वर्ल्डकप गेम्समध्ये भारतीय अंध महिला संघाचे सुवर्णपदक मिळवल्याबद्दल अभिनंदन. आपल्या महिला खेळाडूंच्आ अदम्य भावनेचे आणि प्रतिभेचे उदाहरण देणारी अतुलनीय कामगिरी. भारताला अभिमान वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT