Shillong Lajong 
क्रीडा

I-League 2023-24: चर्चिल ब्रदर्सला शिलाँगच्या संघाकडूनही धक्का! चौथ्या पराभवामुळे आणखी घसरण

Shillong Lajong vs Churchill Brothers: बुधवारी शिलाँग लाजाँगने चर्चिल ब्रदर्सला पराभवाचा धक्का दिला

किशोर पेटकर

I-League 2023-24, Shillong Lajong vs Churchill Brothers:

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या, तर एकंदरीत चौथ्या पराभवामुळे गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सची नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मेघालयातील शिलाँग येथे बुधवारी झालेल्या लढतीत त्यांना शिलाँग लाजाँग एफसीने 2-0 फरकाने हरविले.

घरच्या मैदानावर शिलाँग लाजाँगला सलग चौथा विजय मिळवून देताना लैवांग बोह्हम याने 45 व्या, तर रेनन पॉलिनो याने 51 व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर गोल केला.

शिलाँग लाजाँगने आठ लढतीत चार विजय व तेवढ्याच बरोबरीसह १६ गुणांची कमाई केली आहे. त्यांचे व श्रीनिदी डेक्कन संघाचे समान गुण आहे. गोलसरासरीत शिलाँगच्या संघाला तिसरा क्रमांक मिळाला.

चर्चिल ब्रदर्सला मागील लढतीत दिल्ली एफसीकडून 1-2 फरकाने हार स्वीकारावी लागली होती. बुधवारच्या पराभवामुळे माजी विजेता संघ पदावनती विभागात आला आहे. त्यांचे आठ लढतीतून आठ गुण झाले आहेत. दोन विजय, दोन बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे.

चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना 10 डिसेंबर रोजी नेरोका एफसीविरुद्ध खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT