Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

Harmanpreet Kaur: 'देशाने मला असं पाहू नये म्हणून...' T20 WC सेमीफायनलमधील पराभवानंतर कर्णधार इमोशनल

महिला टी20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभव स्विकारावा लागल्याने भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर खूपच निराश झाली होती.

Pranali Kodre

India Women vs Australia Women: भारतीय महिला संघाला गुरुवारी ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील उपांत्य सामन्यांत पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 धावांनी विजय मिळवल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे या पराभवानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर भावूक झाली होती.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 20 षटकात 8 बाद 167 धावा करता आल्या. महत्त्वाचे म्हणजे हरमनप्रीतने भारताने पहिल्या तीन विकेट्स 28 धावांवर गमावल्यानंतरही विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. तिने आणि जेमिमाह रोड्रिग्जने (43) चौथ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारीही केली होती.

रोड्रिग्ज बाद झाल्यानंतरही तिने तिची लय कायम ठेवली होती. हरमनप्रीतने 34 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारांसह 52 धावा केल्या. पण, विजय जवळ दिसत असतानाच 15 व्या षटकात दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिची बॅट अडकली आणि ती धावबाद झाली. ती धावबाद झाली, तेव्हा भारतीय संघाला 32 चेंडूत 40 धावांची गरज होती. पण ती बाद झाल्यानंतर भारतीय संघ विजयापर्यंत पोहचू शकला नाही. भारताला विजयासाठी केवळ 6 धावा कमी पडल्या.

त्यामुळे या सामन्यानंतर हरमनप्रीत खूपच निराश झाली होती. तिला अश्रू रोखणेही कठीण झाले होते. त्यामुळे ती सामन्यानंतर बोलायलाही गॉगल घालून आली होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हरमनप्रीत या सामन्याआधी आजारी होती. तिला ताप आल्याने हॉस्पिटलमध्येही नेण्यात आले होते. अशातही तिने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला घाम फोडला होता.

दरम्यान, तिने गॉगल घातल्याबद्दल तिला विचारल्यावर तिने सांगितले की 'मला वाटत नाही की माझ्या देशाने मला रडताना पाहावे. त्यामुळे मी गॉगल घातला आहे. मी वचन देते की आम्ही सुधारणा करू आणि आमच्या देशाला पुन्हा असे निराश करणार नाही.'

तसेच सामन्याबद्दल हरमनप्रीत म्हणाली, 'जेमिमाह असताना आम्हाला पुन्हा लय मिळाली होती. जिथून आम्ही हरलो, ते आम्हाला अपेक्षितच नव्हते.'

तसेच जेव्हा ती का रडत आहे, असे विचारल्यावर ती म्हणाली, 'मी ज्याप्रकारे धावबाद झाले, त्यापेक्षा काहीही दुर्दैवी असू शकत नाही. तुम्ही तुमचे योगदान देणे महत्त्वाचे असते आणि आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला, याबद्दल आनंदी आहे. आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचे होते.'

'पहिल्या दोन विकेट्स गेल्यानंतरही आम्हाला माहित होते, आमच्याकडे सखोल फलंदाजी आहे. मी जेमिमाहला श्रेय देईल. तिने आम्हाला लय मिळवून दिली. काही चांगली कामगिरी झालेली पाहून चांगले वाटत आहे.'

ती पुढे म्हणाली, 'आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आज आम्हाला आमचा नैसर्गिक खेळ करायचा होता. आम्ही काही सोपे झेल सोडले. जेव्हा तुम्हाला जिंकायचे असते, तेव्हा तुम्हाला संधीचा फायदा घ्यावा लागतो. आम्ही या चूकांमधून केवळ शिकू शकतो.'

दरम्यान, या सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा महिला टी२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT