IPL 2023 Playoff Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Playoff: प्लेऑफमधून कसे मिळणार दोन फायनालिस्ट? जाणून घ्या संपूर्ण फॉरमॅट

आयपीएलमध्ये प्लेऑफ खेळवला कसा जातो, याचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

IPL Playoff Format: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील साखळी फेरी संपली आहे आणि आता प्लेऑफला सुरुवात होत आहे. 23 मे पासून प्लेऑफला सुरुवात होईल. पण आयपीएलमध्ये प्लेऑफ खेळवला कसा जातो, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

आयपीएल प्लेऑफ

प्लेऑफमध्ये दोन क्वालिफायर सामने, एक एलिमिनेटर आणि एक अंतिम सामना असे एकूण चार सामने खेळवले जातात. पहिल्यांना क्वालिफायरचा पहिला सामना होतो, नंतर एलिमिनेटरचा सामना होतो. त्यानंतर दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जातो. त्यानंतर अंतिम सामना होतो.

एकूणच प्लेऑफचे स्वरुप लक्षात घेतले, तर गुणतालिकेतील स्थान का महत्त्वाचे ठरते, हे लक्षात येऊ शकते. आयपीएल प्लेऑफचे स्वरुप अशाप्रकारे आहे की ज्यामुळे गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या संघांना अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या दोन संधी मिळू शकतात.

कसे आहे स्वरुप

आयपीएल 2023 मधील अंतिम 4 संघ निश्चित झाले आहेत. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी अनुक्रमे गुणतालिकेत पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक पटकात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. 

आता आयपीएल प्लेऑफच्या स्वरुप समजून घेऊ. आता आयपीएल गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर असलेले गुजरात आणि चेन्नई हे दोन संघ 23 मे रोजी पहिला क्वालिफायरचा सामना खेळतील. तसेच 24 मे रोजी गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील लखनऊ आणि मुंबई संघ एलिमिनेटरचा सामना खेळतील.

दरम्यान, पहिल्या क्वालिफायरमध्ये म्हणजे चेन्नई आणि गुजरात यांच्यातील जो संघ विजयी होईल, तो थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. पण पराभूत होणाऱ्या संघाला दुसरी संधी मिळेल. म्हणजेच 26 मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत होणारा संघ एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाविरुद्ध (मुंबई किंवा लखनऊ) सामना खेळेल.

दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल. त्यानंतर २८ मे रोजी पहिल्या क्वालिफायर आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील विजेत्या संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे.

IPL Playoff

असे आहे आयपीएल 2023 प्लेऑफचे वेळापत्रक

  • 23 मे - पहिला क्वालिफायर - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई (वेळ - संध्याकाळी 7.30 वा.)

  • 24 मे - एलिमिनेटर - लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई (वेळ - संध्याकाळी 7.30 वा.)

  • 26 मे - दुसरा क्वालिफायर - पहिल्या क्वालिफायरचा पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरचा विजयी संघ, अहमदाबाद (वेळ - संध्याकाळी 7.30 वा.)

  • 28 मे - अंतिम सामना - पहिल्या क्वालिफायरचा विजेता विरुद्ध दुसऱ्या क्वालिफायरचा विजेता, अहमदाबाद (वेळ - संध्याकाळी 7.30 वा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

SCROLL FOR NEXT