India Hockey Team Dainik Gomantak
क्रीडा

Hockey India: वर्ल्डकप पदकाचा 47 वर्षांचा दुष्काळ संपवताच हॉकी संघाला 'एवढ्या' लाखांचे बक्षीस

हॉकी इंडियाने वर्ल्डकपूर्वीच भारतीय संघासाठी लाखोंचे बक्षीस जाहीर केले आहे.

Pranali Kodre

Hockey World Cup 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात हॉकी वर्ल्डकप 2023 आयोजित केला जाणार आहे. ओडिसामधील भुवनेश्वर-राउरकेला येथे होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी हॉकी इंडिया सज्ज आहे. दरम्यान हॉकी इंडियाने बुधवारी भारतीय संघासाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.

पुढील वर्षी 13 ते 29 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला 25 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफ सदस्याला 5 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल.

तसेच रौप्य पदक मिळवल्यास प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना 3 लाख रुपये बक्षीस दिले जाईल. तसेच जर कांस्य पदक जिंकले, तर संघातील प्रत्येक खेळाडूला 10 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला 2 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

(Hockey Indian Announce cash prize for Indian team ahead of Hockey World Cup 2023)

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला दिल्या जाणाऱ्या बक्षीस रकमेबद्दल 24 डिसेंबरला पार पडलेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे. हा निर्णय भारतीय संघाचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीकोनातून घेतला गेला आहे.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष आणि पद्मश्री विजेते डॉ. दिलीप टिर्की यांनी याबद्दल सांगितले की 'वर्ल्डकपमध्ये पदक जिंकणे सोपे काम नाही. आम्हाला आशा आहे की बक्षीस रकमेची घोषणा आधीपासून विजयासाठी भुकेले असलेल्या भारतीय संघाचे मनोबल वाढवेल. मायदेशात होणाऱ्या वर्ल्डकमध्ये पदक जिंकणे हे खेळाडूंसाठी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठवणींपैकी एक ठरेल. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.'

भारताने यापूर्वी वर्ल्डकपमध्ये तीनवेळा पदक जिंकले आहे. 1971 साली भारताने कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर 1973 साली रौप्य आणि 1975 साली सुवर्णपदकाची कमाई केली होती.

साल 1975 नंतर मात्र भारताला वर्ल्डकपमध्ये पदक जिंकण्यात अपयश आले आहे. त्यामुळे गेल्या 47 वर्षांचा वर्ल्डकप पदकाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान यंदा हरमनप्रीत सिंग नेतृत्व करत असलेल्या भारतीय संघासमोर आहे.

दरम्यान, भारताच्या हॉकी संघाने गेल्या दोन वर्षात शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी गेल्यावर्षी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. तसेच यावर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. त्यामुळे आता वर्ल्डकपमध्येही भारतीय संघाकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे.

सोळा संघात रंगणार स्पर्धा

हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 16 संघ सामील होणार असून त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताचा समावेश डी गटात आहे. या गटात भारतासह इंग्लंड, स्पेन आणि वेल्स संघाचा समावेश आहे.

या स्पर्धेत प्रत्येक गटातून अव्वल स्थान मिळवलेला संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघांमध्ये क्रॉसओव्हर सामने होतील. यातील विजयी 4 संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.

त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतील विजयी संघ उपांत्य फेरीचे सामने खेळतील. उपांत्य फेरीत विजय मिळवणारे दोन संघ अंतिम सामन्यात दोन हात करतील, तर पराभूत संघ कांस्य पदकासाठी लढतील.

हॉकी इंडियाने या स्पर्धेसाठी 18 जणांचा भारतीय संघ घोषित केला आहे. या संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत सिंग आणि उपकर्णधारपद अमित रोहिदास सांभाळणार आहेत.

असा आहे भारतीय संघ

गोलकिपर - कृष्णा पाठक, आर श्रीजेश

डिफेंडर - जरमनप्रीत सिंग, सुरिंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), निलम संजीप जेस

मिडफिल्डर - मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग

फॉरवर्ड - मनदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग

राखीव खेळाडू - राजकुमार पाल, जुगराज सिंग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिनाभरात बैलांना मायक्रोचीप बसवा, अन्‍यथा 50 हजार दंड; धीरयो रोखण्‍यासाठी मालकांना 'वेसण'

Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Rashi Bhavishya 21 August 2025: निर्णय घेताना सावध राहा,आर्थिक लाभाची शक्यता; महत्वाची कामे पूर्ण होतील

गोवा काँग्रेसने काळे झेंडे दाखवले, निषेध केला; त्याच सुदर्शन रेड्डींना इंडिया आघाडीने दिली उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी

Colvale: रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळली महिला पर्यटक, भाषेच्या अडचणीमुळे स्थानिकांशी संवाद कठीण; कोलवाळ हायवेवरील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT