Hockey Dainik Gomantak
क्रीडा

हॉकी इंडीयाची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार

कोरोनाचा वाढता (Covid 19) धोका आणि ब्रिटनमधील 10 दिवसांच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याच्या निर्बंधामुळे हॉकी इंडियाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

हॉकी इंडीयाने (Hockey India) पुढील वर्षी पार पडणाऱ्या राष्ट्रकु स्पर्धेमधून (Commonwealth Games) माघार घेतली आहे. हॉकी इंडीयाने यासंबंधीच्या निर्णयाची घोषणाही केली आहे. कोरोनाचा वाढता धोका आणि ब्रिटनमधील 10 दिवसांच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याच्या निर्बंधामुळे हॉकी इंडियाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका युरोपमध्ये (Europe) ब्रिटनला (Britain) असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात कोरोना महामारी हे वैश्विक संकट आहे. आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचे नाही. मात्र आमची प्राथमिकता आशियाई क्रिडा स्पर्धेला असल्याचे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.

28 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022 या स्पर्धा इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये (Birmingham) पार पडणार आहेत. त्यानंतर 32 दिवसांमध्येच ग्वांग्झू येथे आशियाई क्रिडा स्पर्धा होणार आहे. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेला अजून बराच कालावधी असला, तरी इंग्लंडने पुढच्या महिन्यामध्ये भारतात होणाऱ्या कुमार विश्वकरंडक स्पर्धेमधून माघार घेतली आहे. त्यामुळे हॉकी इंडियाने स्पर्धेमधून माघार का घेतली अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव हे कारण सांगत हॉकी इंडियाने इंग्लंडला आपला निर्णय कळवला आहे.

शिवाय, सध्या कोरोनाचा युरोपमध्ये सर्वाधिक धोका इंग्लंडला आहे. त्याचबरोबर भारतीय नागरीकांसाठी तेथे 10 दिवसांचे विलगीकरण अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी हाच नियम असणार आहे. त्यामुळे आम्ही स्पर्धेमधून माघार घेत असल्याचे आधिच कळवत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT