Hima Das Dainik Gomantak
क्रीडा

स्टार अ‍ॅथलीट हिमा दासला मोठी शिक्षा, 'या' कारणामुळे NADA ने केले सस्पेंड!

Hima Das Suspended By NADA: भारताची स्टार धावपटू हिमा दास हिला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) तात्पुरते निलंबित केले आहे.

Manish Jadhav

Hima Das Suspended By NADA: भारताची स्टार धावपटू हिमा दास हिला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) तात्पुरते निलंबित केले आहे. 12 महिन्यांत तिने तीन वेळा एकच चूक केली. हिमा दासला नियम मोडल्याबद्दल निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आसामची (Assam) 23 वर्षीय धावपटू हिमा दासला या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीमुळे हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही.

दोन वर्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते

पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतीय संघाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले- "नाडाने तिला तात्पुरते निलंबित केले आहे." तसेच, तिला जास्तीत जास्त दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते.

तथापि, दोषाच्या डिग्रीनुसार हे एक वर्ष कमी केले जाऊ शकते. हिमाने 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

जकार्ता येथे झालेल्या महिलांच्या (Women) 4x400m आणि मिश्र 4x400m रिले क्वार्टरमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या संघाचाही ती भाग होती.

नियम काय आहेत?

नियमांबद्दल बोलायचे झाल्यास, 12 महिन्यांत तीन विफलता मानल्या जातात. यामध्ये फाइलिंग किंवा टेस्ट मीस करणे हे डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन मानले जाते.

नियमांनुसार, प्रत्येक खेळाडूला डोप सॅम्पल देण्यासाठी वाडा किंवा नाडाकडे वेळ नोंदवावा लागतो. तुम्ही तीन वेळा 'व्हेअर अबाउट' न दिल्यास, ते उल्लंघन मानले जाते आणि त्यावर तात्पुरती बंदी घातली जाते.

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, खेळाडूला स्वतःबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागते. यादरम्यान तो कोठे राहिला, त्याने टेस्ट किंवा प्रशिक्षणात भाग घेतला की नाही, हे त्याला सांगावे लागते.

हिमा दास गेल्या काही वर्षांपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे तिला फेडरेशन कप आणि राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपला मुकावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

SCROLL FOR NEXT