Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: बुमराह मोडणार कपिल देवचा 31 वर्ष जुना रेकॉर्ड, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात करणार कमाल!

Jasprit Bumrah: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बांगलादेशविरुद्ध मोठा विक्रम करण्यापासून अवघ्या काही पावलं दूर आहे.

Manish Jadhav

Jasprit Bumrah: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बांगलादेशविरुद्ध मोठा विक्रम करण्यापासून अवघ्या काही पावलं दूर आहे. तो कपिल देव यांचा 31 वर्ष जुना विक्रम मोडू शकतो.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो ही कामगिरी करु शकतो. चालू विश्वचषकाच्या मोसमात आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली आहे आणि 14 सामन्यांनंतर तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे.

बुमराह शानदार फॉर्ममध्ये आहे

दरम्यान, अनेक महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा जसप्रीत बुमराह सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत.

आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो या स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्यात बुमराहने यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानलाही आपला बळी बनवले होते. आता बुमराहची नजर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या 31 वर्षे जुन्या विक्रमावर असेल.

बुमराह हा मोठा विक्रम मोडण्याच्या जवळ आहे

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये 26 फलंदाजांना बाद केले आहे. त्याचा 13वा विश्वचषक सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यात तो महान कपिल देव यांना मागे टाकू शकतो.

विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये कपिल देव यांचे नावही सामील आहे. 1979-1992 दरम्यान त्यांनी 28 विकेट घेतल्या होत्या. बुमराह त्यांना मागे सोडण्यापासून फक्त 3 विकेट दूर आहे. पुढच्या सामन्यात त्याने 3 विकेट घेतल्यास तो कपिल देव यांना मागे सोडेल.

विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

झहीर खान - 44

जवागल श्रीनाथ - 44

मोहम्मद शमी - 31

अनिल कुंबळे - 31

कपिल देव - 28

जसप्रीत बुमराह - 26

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT