Heather Knight Dainik Gomantak
क्रीडा

ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारी हेदर नाइट ठरली इंग्लंडची दुसरी खेळाडू

इंग्लंडचा (England) संघ पहिल्या डावात ऑस्ट्रेलियापेक्षा अजूनही 102 धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 9 बाद 337 धावांवर घोषित केला.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पुन्हा अ‍ॅशेसची लढत रंगणार आहे. परंतु यावेळी सामना दोन्ही देशांच्या महिला क्रिकेटपटूंमध्ये आहे. मात्र, पुरुष संघाप्रमाणेच इथेही इंग्लंडची फलंदाजी कर्णधार हीदर नाइटच्या अवतीभवती फिरली. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 8 बाद 235 धावा केल्या असून, हीदर नाइटने (Heather Knight) एकमेव नाबाद 127 धावा केल्या. इंग्लंडचा (England) संघ पहिल्या डावात ऑस्ट्रेलियापेक्षा (Australia) अजूनही 102 धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 9 बाद 337 धावांवर घोषित केला. (Heather Knight Became The Second England Player To Score a Test Century In Australia)

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात सुमारचं झाली. 50 धावांच्या आतच त्यांचे आघाडीचे 3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. परंतु कॅप्टन हीदर नाइट संघासाठी एक टोक धरुन उभी होती. तीने एकट्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा सामना करताना दिसली. परिणामी, असे झाले की दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तिने एका अप्रतिम शतकाची पटकथा लिहिली होती.

इंग्लंडच्या कर्णधार हिदर नाइटने केले शानदार शतक

हिदर नाइटने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 249 चेंडूंत 13 चौकार आणि 1 षटकारासह 127 धावा केल्या. तिचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक होते. या शतकासह ती ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारी इंग्लंडची दुसरी खेळाडू ठरली. त्याच्या आधी शार्लोट एडवर्ड्सने जानेवारी 2011 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या कसोटीत शतक झळकावले होते. नाईटने आता त्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

इंग्लंडचा कर्णधार म्हणून पहिले कसोटी शतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतील हेदर नाइटचे शतक हे इंग्लंडचे कर्णधार म्हणून पहिले शतक आहे. अशा प्रकारे ती सध्याच्या महिला क्रिकेटपटूंमध्ये मिग्नॉन डू प्रीझच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. प्रीझने 2014 साली भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत कर्णधार म्हणून शतक झळकावले होते. त्यानंतर प्रीझने 102 धावांची खेळी खेळली.

हीदर नाईटच्या हातात संघाची कमान

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीत अजूनही 102 धावांचे अंतर आहे. हे अंतर कमी करण्यासाठी हेदर नाइटला तिसऱ्या दिवसाच्या खेळात संघाची कमान संभाळणे आवश्यक आहे. तसेच इतर खेळाडूंनाही विकेट गमावणे टाळावे लागणार आहे. तिसर्‍या दिवशी हीदर नाईट जितकी जास्त वेळ खेळेल, तितका तिचा फायदा इंग्लंड संघाला होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

Horoscope 2 November 2026: लाभ, प्रगती आणि संयमाची सांगड घालणारा आजचा दिवस!  'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; चंद्र-मंगळची युती ठरणार वरदान

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

SCROLL FOR NEXT