WPL 2023 Auction Dainik Gomantak
क्रीडा

WPL Auction 2023: जल्लोष तर होणारच! कोट्यवधींची बोली लागल्यानंतर मानधना, हरमनप्रीतचा टीम इंडियासह 'कल्ला'

पहिल्या वूमन्स प्रीमियर लीग हंगामाच्या (WPL 2023) लिलावात कोट्यवधींची बोली लागल्यानंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी मोठा जल्लोष केला.

Pranali Kodre

WPL Auction 2023: सोमवारी (13 फेब्रुवारी) वूमन्स प्रीमियर लीग 2023 (WPL) हंगामाचा लिलाव मुंबईत पार पडला. डब्ल्यूपीएलचा हा पहिलाच लिलाव होता. या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना मोठ-मोठ्या बोली लागल्या. यामध्ये भारतीय महिला संघाच्या कर्णधार आणि उपकर्णधार म्हणजेच हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या खेळाडूंचाही समावेश आहे.

त्यामुळे या दोघींनीही त्यांना कोट्यवधींची बोली लागल्यानंतर भारतीय संघातील संघसहकाऱ्यांसह जल्लोष केला. त्यांच्याशिवाय भारतीय संघातील इतर खेळाडूंच्या लिलावावेळीही भारतीय खेळाडूंनी कल्ला केला होता. त्यांच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

सध्या भारतीय महिला संघ आठवा महिला टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेला आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेतूनच हा लिलाव लाईव्ह पाहिला. हा लिलाव लाईव्ह पाहात असतानाच्या काही क्षणांचा व्हिडिओ डब्ल्यूपीएलच्या सोशल मीडिया हँडेलवर शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरच्या बोलींवेळी भारतीय संघाने केलेला जल्लोष दिसून येत आहे. तसेच दिप्ती शर्मा, रेणूका सिंग, रिचा घोष यांच्या लिलावावेळीही भारतीय खेळाडूंनी आनंद व्यक्त केला.

या व्हिडिओमध्ये लिलावावेळीची भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरील उत्कंठा आणि आनंद दिसून येत आहे. त्यांना मोठी बोली लागल्यानंतर भारतीय संघातील संघसहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केल्याचेही दिसले आहे.

मानधना आणि हरमनप्रीत कौर यांचे नाव या लिलावात सुरुवातीच्याच सेटमध्ये आले होते. या दोघींसाठीही मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये चूरस पाहायला मिळाली होती.

दरम्यान, या लिलावात पहिलेच नाव आलेल्या मानधनाची बोली बेंगलोरने जिंकली. त्यांनी तिला 3 कोटी 40 लाख रुपयांमध्ये खरेदी करत संघात सामील करून घेतले. ती या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरली.

तसेच हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. त्यांनी तिच्यासाठी 1 कोटी 80 लाख रुपये मोजले. त्यामुळे आता पहिल्या डब्ल्यूपीएल हंगामात मानधना बेंगलोरकडून आणि हरमनप्रीत मुंबईकडून खेळताना दिसणार आहे.

तसेच दीप्ती शर्मालाही मोठी बोली लागली असून तिला 2 कोटी 60 लाख रुपयांमध्ये युपी वॉरियर्स संघाने खरेदी केले. तर उदयोन्मुख खेळाडू रेणूका सिंगला बेंगलोरने 1 कोटी 50 लाख रुपयांमध्ये आपल्या गोटात सामील करून घेतले आहे.

डब्ल्यूपीएल लिलावामध्ये एकूण 448 खेळाडूंचा समावेश होता. त्यांचा 90 जागांसाठी लिलाव होणार होता. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स अशी पाचही संघांची नावे आहेत.

डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या हंगामात एकूण 22 सामने खेळवले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT